व्हिएन्ना : इराण व जागतिक महासत्ता यांच्यात होणाऱ्या अणुकरारासाठी अंतिम तारीख २४ नोव्हेंबर ही असून, या मुदतीच्या आत करार होणे आता अशक्य आहे, असे इराणी विद्यार्थ्यांची संघटना इस्राने म्हटले आहे. इराणच्या अणुकार्यक्रमामुळे अमेरिका व इतर महासत्तांशी निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी या वाटाघाटी होत आहेत. अमेरिका व जर्मनी वाटाघाटींची मुदत वाढविण्याच्या विचारात आहेत. अणुकरारासाठी घातलेली अंतिम मुदतीची मर्यादा सोमवारी संपत असल्याने, या मुदतीत हा करार होणे शक्य नाही. असे इराणच्या वाटाघाटी करणाऱ्या सूत्रांचा हवाला देत इस्राने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
अणुकरार होणे अशक्य - इराण
By admin | Updated: November 24, 2014 02:03 IST