शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आधी इंधनावरील अनुदान हटवा, मग पैसे मागायला या; IMF नं पाकिस्तानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 12:50 IST

अर्थव्यवस्थेचं कारण सांगत पाकिस्ताननं पुन्हा आयएमएफकडे पसरले हात.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला बुधवारी स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. जर पाकिस्तानला पैसे हवे असतील तर त्यांनी इंधनावर दिलेलं अनुदान तात्काळ मागे घ्यावं, असं आयएमएफनं स्पष्टपणे सांगितलं आहे. तसंच IMF ने जोर दिला की मदत कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘इंधन आणि ऊर्जा सबसिडी काढून टाकणे’ आवश्यक आहे.

इंधन आणि ऊर्जेवरील अनुदान मागे घेता येणार नाही. कारण तो भार राष्ट्र सहन करू शकणार नाही हे आपण आयएमएफला सांगणार आहोत, असं या आठवड्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माइल म्हणाले होते. तसंच हे अनुदान यापूर्वीच्या पीटीआय सरकारद्वारे देण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

"कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंधन आणि ऊर्जा अनुदान आणि आर्थिक वर्ष २०२३ अर्थसंकल्प काढून टाकण्याच्या दृष्टीने ठोस धोरणात्मक कारवाईवर भर दिला आहे,” असं बुधवारी एका निवेदनाद्वारे आयएमएफनं सांगितलं. धोरणे आणि सुधारणांबाबत करारावर पोहोचण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी अधिकार्‍यांशी ‘अत्यंत रचनात्मक चर्चा’ केली असल्याची माहितीही आयएमएफनं दिली. 

दोहामध्ये बैठकआयएमएफ आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये दोहा येथे ही बैठक पार पडली. दरम्यान, IMF ने पाकिस्तानला ६ अब्ज डॉलर्सच्या एक्सटर्नल फायनान्सिंग फॅसिलिटी (EFF) अंतर्गत रखडलेला पुढील टप्पा पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातही महागाई आणि खराब अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानी रुपया घसरला आहे. तसंच परकीय चलनाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानसमोर संकट उभं ठाकलं आहे. यातून बाहेर येण्यासाठी त्यांना आयएमएफकडून बेल आऊट पॅकेजच्या पुढच्या टप्प्यातील रकमेची गरज आहे. परंतु पाकिस्तानातील राजकीय संकटादरम्यान त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतही थांबवण्यात आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था