शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

"2020 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले असते तर यूक्रेन युद्ध झाले नसते, त्यांचा विजय..."! पुतिन यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:14 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेन युद्धासंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अमेरिकेचे ...

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेन युद्धासंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी सत्तेत असते, तर 'युक्रेन संकट' टळू शकले असते. हा संघर्ष रोखण्यासाठी आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत, असे पुतिन यांनी म्हटेल आहे.

तत्पूर्वी, जर आपण सत्तेवर असतो, तर हे युद्ध झाले नसते, असे ट्रम्प यांनीही वारंवार म्हटले आहे. आता पुतिन यांनीही हेच  म्हटले आहे. याच बरोबर, 2020 च्या निवडणुकीत आपला विजय दुसऱ्या पक्षाने हिरावून घेतला होता, या ट्रम्प यांच्या आरोपाचाही पुतिन यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

आम्ही युक्रेन मुद्द्यावर चर्चेसाठी तयार -माध्यमांतील वृत्तांनुसार, पुतिन म्हणाले, "मी ट्रम्प यांच्याशी सहमत आहे, जर २०२० मध्ये त्यांचा विजय हिरावून घेतला गेला नसता, तर कदाचित २०२२ मध्ये युक्रेन संकट उद्भवले नसते. हे त्यांच्या बाबतीत चुकीचे झाले. चर्चेसंदर्भात बोलायचे तर, आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत आणि मी पुन्हा एकदा हेच बोलतो की, आम्ही युक्रेन मुद्द्यावर चर्चेसाठी तयार  आहोत."

काय म्हणाले होते ट्रम्प - तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, आपण युक्रेन युद्ध 'एका दिवसात' संपवू शकतो. तथापी, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी त्यांचे विशेष दूत कीथ केली यांना १०० दिवसांची मुदतही दिली आहे. ट्रम्प म्हणाले, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शांततेसंदर्भात आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे आणि पुतिन यांनीही तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा. 'मला वाटते की रशियाने तडजोड करायला हवी. कदाचित त्यांनाही तडजोड करायची आहे. माझ्या माहितीनुसार, पुतिन देखील मला भेटू इच्छितात. आपण शक्य तेवढ्या लवकर भेटू.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया