नवी दिल्ली : इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावादरम्यान, पाकिस्तानी खासदार शेर अफझल खान मारवत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. एका पत्रकाराने त्यांना विचारले की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर तुम्ही काय कराल. यावर त्यांनी म्हटले की, जर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन.
व्हायरल व्हिडीओत, पत्रकाराने मारवत यांना विचारले की, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयम कसा बाळगला पाहिजे. यावर त्यांनी म्हटले की, मोदी माझ्या मावशीचा मुलगा नाही, जे माझ्या इशाऱ्यावर मागे हटतील. मारवत एकेकाळी इम्रान खानच्या पक्ष पीटीआयचे महत्त्वाचे सदस्य होते; परंतु कालांतराने त्यांनी पक्षावर टीका करण्यास सुरुवात केल्याने इम्रान खान यांनी पक्षाच्या पदांवरून काढून टाकले. ही घटना पाकिस्तानी राजकारणात अस्थिरता व दिशाहीनता किती प्रमाणात आहे, याचे उदाहरण आहे.
भारतीय क्षेपणास्त्रे ‘अब्दाली’पेक्षा भारीच
नवी दिल्ली : पाकिस्तानने शनिवारी आपल्या ‘अब्दाली’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हत्फ-१ या क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती आहे. असे असले तरी भारताकडील क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या तुलनेत प्रचंड क्षमतेची असून, शत्रूराष्ट्राच्या कोणत्याही भागांत हल्ले करण्याची या अस्त्रांची क्षमता आहे.
भारतीय क्षेपणास्त्रे तगडीच५००० ते ५५०० किमी अग्नी-५ या भारतीय क्षेपणास्त्राचा पल्ला४००० किमी अग्नी-४ क्षेपणास्त्राचा पल्ला३००० ते ३५०० किमी पल्ला अग्नी-३चा