शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केल्यास...; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:17 IST

अमेरिकेसोबतच्या अणुकरारास स्थगिती, रशिया आणि अमेरिकेने २०१०मध्ये ‘न्यू स्टार्ट’वर स्वाक्षरी केली होती

मॉस्को : अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने झालेल्या करारातील आपला सहभाग थांबवत असल्याची घोषणा करून अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केली, तर रशियाही मागे राहणार नाही, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. 

रशिया आणि अमेरिकेने २०१०मध्ये ‘न्यू स्टार्ट’वर स्वाक्षरी केली होती. हा करार दोन्ही देशांद्वारे तैनात करता येणाऱ्या लांब पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांची संख्या मर्यादित करतो आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर मर्यादित करतो.युक्रेनबरोबरच्या युद्धाला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले की, रशिया अद्याप या करारातून पूर्णपणे माघार घेत नाही. अमेरिकेने पुन्हा अण्वस्त्रांच्या चाचण्या सुरू केल्यास रशियालाही तशी तयारी ठेवावी लागेल.

पाश्चात्त्यांनीच संघर्ष भडकावला पुतिन यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित भाषणात रशिया आणि युक्रेनला पश्चिमेच्या दुटप्पीपणाचा “बळी” म्हणून वर्णन करत युक्रेन नव्हे तर रशिया आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे, असा दावा केला.  “आमचे युक्रेनच्या लोकांशी युद्ध नाही. कीव्हच्या राजवटीने युक्रेनला ओलिस ठेवले आहे आणि पाश्चात्त्य देशांनी प्रभावीपणे देशाचा ताबा घेतला आहे, असे ते म्हणाले. आपल्या संबोधनात, पुतिन यांनी वारंवार युद्ध योग्य ठरवले आणि युक्रेनमधील व्यापलेल्या प्रदेशातून सैन्य मागे घेण्याचे आंतरराष्ट्रीय आवाहन फेटाळले. रशिया प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

रशियाला पराभूत करणे अशक्यपुतीन म्हणाले की, पाश्चात्य देशांना माहीत आहे की रशियाला युद्धभूमीवर पराभूत करणे अशक्य आहे, म्हणून ते ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडून प्रचार हल्ले सुरू केले. युद्ध योग्यच असल्याचे सांगत पुतिन म्हणाले की, त्यांचे सैन्य युक्रेनच्या प्रदेशात नागरिकांचे संरक्षण करत आहे. आम्ही लोकांच्या जीवनाचे, रक्षण करत आहोत.

युक्रेन युद्धाच्या आगीत तेल ओतू नका : चीनबीजिंग : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपविण्यासाठी आपला देश भूमिका बजावू इच्छितो, परंतु पाश्चिमात्य देशांनी युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असे मत चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गँग यांनी मंगळवारी व्यक्त केले. सुमारे एक वर्षापासून सुरू असलेले युद्ध वाढू शकते आणि नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, याची चीनला चिंता आहे, असे गँग म्हणाले.

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिन