शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने प्रस्ताव मान्य केल्यास कुलभूषण जाधव यांची सुटका शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 10:42 IST

भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दुस-या एका दहशतवाद्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्दे2014 साली पेशावरमधील लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी अफगाणिस्तानातील तुरुंगात बंद आहे. पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे.

न्यूयॉर्क - भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दुस-या एका दहशतवाद्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खाव्जा असिफ यांनी न्यूयॉर्कमध्ये ही माहिती दिली. कुलभूषण जाधव पाकिस्तानीत तुरुंगात बंद आहेत.  2014 साली पेशावरमधील लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी अफगाणिस्तानातील तुरुंगात बंद आहे. 

या दहशतवाद्याचे पाकिस्तानला हस्तांतरण करण्याच्या बदल्यात कुलभूषण जाधव यांना  अफगाणिस्तानकडे सोपवावे लागेल असे ख्वाजा असिफ यांनी सांगितले. असिफ यांनी अफगाणिस्तानच्या ताब्यात असलेल्या त्या दहशतवाद्याचे नाव उघड केलेले नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी हा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. 

पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. कुलभूषण जाधव यांना अफगाणिस्ताकडे सोपवल्यास आपल्याला हवा असलेला दहशतवादी मिळू शकतो असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी मला सांगितले. न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीच्या कार्यक्रमात असिफ यांनी हे वक्तव्य केले. 

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा ठपका ठेवला आहे. भारताने पाकिस्तानी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली. भारताने दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप अंतिम निकाल आला नसला तरी, आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसंबंधी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास',  दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं की, 'सध्या तो घरकैदेत आहेत. मात्र आम्हाला अजून कडक कारवाई केली पाहिजे हे मान्य करायला हवं. पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत जे

पाकिस्तानाच अडचणी असताना डोकेदुखी ठरु शकतात. या मताशी मी सहमत आहे'. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मान्य केलं. मात्र त्यासाठी अजून वेळ हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. 'हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी डोकेदुखी आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सध्या आमच्याकडे ताकद नाही', असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान