शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"अण्वस्त्रांचा वापर केला तर जगाच्य नकाशावरून पुसून टाकू"! या देशाची हुकूमशहा किम जोंगला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:02 IST

या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने धमक्यांचे सत्र सुरू आहे...

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. आता दक्षिण कोरियानेउत्तर कोरियाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे वापरण्याचा विचार केला, तर त्यांना नकाशावरून पुसून टाकू, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. खरे तर, दक्षिण कोरियाने दिलेली धमकी काही नवीन नाहीत. या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने धमक्यांचे सत्र सुरू आहे...

खरे तर, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यूं सुक येओल यांनी उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्रसाठ्याचा सामना करण्यासाठी गुरुवारी संयुक्त आण्विक प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत दक्षिण कोरियाची क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या करारानंतर उत्तर कोरियाकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. यात, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील या कराराचा प्रथम निषेध करण्यात आला. तसे, सियोल आणि वॉशिंग्टनला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असेही म्हणण्यात आले आहे. याशिवाय हे चिथावणीखोर कृत्य असल्याचेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.

किम जोंगच्या धमकीनंतर दक्षिण कोरीयानेही दिली धमकी -किम जोंगकडून मोठी किंमत मोजावी लागण्याची धमकी दिल्यानंतर दक्षिण कोरियाने ही त्यांना धमकी दिली आहे. जर उत्तर कोरियाने अण्वस्त्रे वापरली, तर त्याला नष्ट करू, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने धमकी देत म्हटले आहे की, अण्वस्त्र हल्ला केल्यानंतर उत्तर कोरिया वाचू शकेल, अशी कुठलीही शक्यता नाही. आता उत्तर कोरियाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरियाAmericaअमेरिका