शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवमध्ये भारतानं हस्तक्षेप केल्यास शांत नाही बसणार, चीनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 23:40 IST

मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे.

नवी दिल्ली- मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे. भारताला ब-याचदा मालदीवपासून दूर राहण्याचा सल्ला देणा-या चीननं आता भारताला गंभीर इशारा दिला आहे. भारतानं मालदीवमध्ये लष्करी कारवाई केल्यास चीन त्यांना रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलेल, असं चीननं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमधून छापलं आहे.अर्थातच चीननं भारताला सैन्य कारवाईचा अप्रत्यक्षपणे इशारा देऊन टाकला आहे. तर दुसरीकडे मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारतानं 1988साला सारखं पाऊल उचलत सैन्य कारवाई केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. मात्र भारतानं अद्यापही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ग्लोबल टाइम्समधून छापलेल्या लेखात भारताला सबुरीला सल्ला देण्यात आला आहे. मालेमधली तणावपूर्ण स्थिती पाहता भारतानं संयम बाळगला पाहिजे. मालदीव सद्यस्थितीत अराजकतेचा सामना करतोय. मालदीवचा हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे बाहेरील देशाच्या हस्तक्षेपाचा चीन कडाडून विरोध करेल. जर भारतानं तिथे सैन्य घुसवलेच तर त्यांना रोखण्यासाठी चीनला महत्त्वाचे पाऊल उचलावे लागेल, असंही लेखात नमूद करण्यात आलं आहे.काही भारतीय हे मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करावा, अशी वकिली करतायत. परंतु आंतरराष्ट्रीय दृष्ट्या हे योग्य नाही. सर्व देश स्वतःचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्वाच्या सिद्धांताचा सन्मान करतात. मालदीवमधील परिस्थिती आणखी चिघळल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावरचा तोडगा काढला जाईल. एकतर्फी सैन्य हस्तक्षेपानं जागतिक व्यवस्था बिघडवली आहे. ग्लोबल टाइम्सनं छापलेल्या लेखात 1988मधल्या मालदीवमधल्या भारताच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख केला आहे. संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, 1988मध्ये सरकारच्या विरोधातील काही बंडखोर लोक श्रीलंकेतून आलेल्या शस्त्रास्त्रधारी सैनिकांच्या मदतीनं सत्ता उलटवून टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या विनंतीवरून भारतानं 1600 सैनिकांना मालदीवमध्ये पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.काही लोकांच्या मते मालदीवच्या माध्यमातून भारतानं शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर काहींना वाटतं भारतानं मालदीवमधलं तत्कालीन सरकार वाचवलं. सुरक्षेसाठी मालदीव भारतावर निर्भर राहत असल्यानं भारताला गर्विष्ठ केलं आहे. त्यामुळेच भारत मालदीवला स्वतःच्या प्रभावाखाली आणू इच्छितो. परंतु मालदीवला राजनैतिकदृष्ट्या भारत नेहमीच दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यानं मालदीवही वैतागला आहे. मालदीव हा चीन, अमेरिका, सौदी अरेबिया, पाकिस्तानकडे झुकत असल्यानं भारताचा तीळपापड होतोय, असंही लेखातून छापण्यात आलं आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखानुसार भारतावर आगपाखड करण्यात आली आहे.   

टॅग्स :chinaचीन