शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो तर मुस्लीम देशांतील वादग्रस्त लोकांवर बंदी घालेन'- डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 19:52 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद, इस्रायल-हमास युद्धावरुन जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका केली.

America Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास मुस्लिमबहुल देशांतील काही वादग्रस्त लोकांवर पुन्हा प्रवास बंदी लागू करणार, असे ते म्हणाले आहेत. शनिवारी रिपब्लिकन ज्यू कोलिशनच्या वार्षिक शिखर परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी ट्रम्प म्हणाले, अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी अशा लोकांवर देशात बंदी घालेन. आम्हाला आमच्या देशात असे लोक नको, ज्यांच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात. माझ्या कारकिर्दीत एकही अशा घटना घडली नाही, कारण आम्ही त्या लोकांना आमच्या देशाबाहेर ठेवले. दरम्यान, 2017 मध्ये ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी इराण, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन आणि सुरुवातीला इराक आणि सुदानमधील काही लोकांवर निर्बंध लादले होते.

110 टक्के इस्रायलच्या पाठीशी आपल्या संबोधनावेळी शेकडो समर्थकांसमोर ट्रम्प यांनी इस्रायलसोबत असल्याचे जाहीर केले. जो बायडेन यांच्या कमकुवतपणामुळे आपला देश नष्ट होईल, अशी भीती वाटत असलेल्या प्रत्येक अमेरिकनला मी हे वचन देतो. तुमचा अध्यक्ष या नात्याने मी देशात शांतता प्रस्थापित करेन आणि तिसरे महायुद्ध रोखेन, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

...तर हल्ला झाला नसताट्रम्प पुढे म्हणाले, मी राष्ट्राध्यक्ष असतो तर इस्रायलवर कधीही हल्ला झाला नसता. आमच्या काळात सर्वात क्रूर दहशतवादी कासिम सुलेमानीचा खात्मा केला. पूर्वीच्या नेत्यांनी अनेक आश्वासने तोडली, पण मी माझे वचन पाळले. मी व्हाईट हाऊसमध्ये परतेन तेव्हा अमेरिकेच्या शत्रूंना पुन्हा एकदा कळेल की जर तुम्ही आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हालाही ठार मारू. तुम्ही आमच्या रक्ताचा एक थेंब सांडला तर आम्ही तुमच्या रक्ताचे पाट वाहू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

व्हाईट हाऊसने केली टीका ट्रम्प यांच्या वक्तव्यावर व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अँड्र्यू म्हणाले, 2020 मध्ये इस्लामोफोबियामध्ये वाढ झाल्याचे पाहून राष्ट्राध्यक्ष जो बाडेन यांनी अशा निर्णयांचा निषेध केला होता. त्यांनी याला एक घातक रोग म्हटले होते. बायडेन यांनी ही घृणास्पद मुस्लिम बंदी काढून टाकली. बाडेन यांनी इस्लामोफोबियाविरोधात कारवाई केली, पुढेही ही कारवाई केली जाईल. इस्लामोफोबिक घटनांमध्ये होणारी वाढ हा आपल्या राष्ट्राच्या चारित्र्यावर थेट हल्ला आहे. आपण द्वेषाला प्रोत्साहन देत नाही, हे महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाMuslimमुस्लीमInternationalआंतरराष्ट्रीय