शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जर मी राष्ट्राध्यक्ष असतो...; इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:56 IST

शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.

वॉशिंग्टन - हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर जगभरातील देशांमध्ये चर्चा सुरू आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध सुरू आहे. बलाढ्य अमेरिकेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली हवाई दलाकडूनही ७२ तासांपासून गाझा पट्टीवर बॉम्बफेक केली जात आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. इमारतींचे ढिगाऱ्यांचे ढीग झाले आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका विशद केली आहे.

शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर सुमारे पाच हजार रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्राइलकडून गाझापट्टीवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संघर्षात आतापर्यंत एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये इस्राइली नागरिकांसह काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, या संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्रायलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. इस्रायल गंभीर संकटाचा सामना करत आहे. या परिस्थितीत अमेरिका त्याला पूर्ण साथ देईल, असे अमेरिकेने ठामपणे सांगितले. मात्र, यातच आता अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यास विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरले आहे. इस्रायलवर होत असलेल्या हल्ल्यास बायडनच जबाबदार आहेत. मी जर अमेरिकेचा राष्ट्रपती असतो, तर हा हल्ला झालाच नसता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. सोमवारी न्यू हम्पशायर येथील एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर निशाणा साधला. मी राष्ट्रपती असताना आपल्याकडे ताकद आणि शांतता होती. मात्र, आता आपल्याकडे संघर्ष, कमजोरी आणि अराजकता आहे. आजमित्तीस मी राष्ट्रपती असतो, तर इस्रायल हल्ल्याची घटना घडलीच नसतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले.  

इस्रायलकडून हल्ल्यास प्रत्त्युत्तर 

इस्रायलने गाझामधील हमासची १७०० ठिकाणे नष्ट केले. यामध्ये ४७५ रॉकेट यंत्रणा आणि हमासच्या ७३ कमांड सेंटरचा समावेश आहे. इस्रायलने २३ इमारतींवरही हल्ला केला, ज्या इमारती हमास दहशतवादी वापरतात. याशिवाय २२ भूमिगत तळही उद्ध्वस्त करण्यात आले. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की गाझामध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात ७०४ पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यात १४३ मुले आणि १०५ महिलांचा समावेश आहे. तर ४ हजार लोक जखमी झाले आहेत.

म्हणून अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा

इस्रायलसोबत अमेरिका असण्यातलं पहिलं कारण म्हणजे मध्य-पूर्वेतील राजकीय परिस्थिती. येथील राजकीय स्थितीमुळे इस्रायलला साथ देणं अमेरिकेला भाग आहे. पॅलेस्टाइनला इस्लामिक देश ज्याप्रमाणे पाठिंबा देतात. ते अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी चांगलं मानलं जात नाही. अमेरिकेचा मध्य पूर्वेत दबदबा राखायचा असेल, तर कट्टर इस्लामिक विचारांना विरोध करणाऱ्या एका देशाची आवश्यकता आहे, असं अमेरिकन रणनीतिकारांचं मत आहे. इस्राइल हा इस्लामिक कट्टरतावादाविरोधात उभा राहणारा देश असल्याने अमेरिकेचा नेहमी त्याला पाठिंबा मिळतो.

दोन्हीही पक्षाच्या नेत्याकडून पाठिंबा

अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ज्यू लॉबीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे अमेरिकेत कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी जेव्हा इस्रायलचा प्रश्न येतो तेव्हा तेथील सरकारला इस्रायलच्या बाजूने उभं राहावं लागतं.  त्यामुळेच जेव्हा कधी इस्रायलची सुरक्षा किंवा इतर प्रश्न निर्माण होतो तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिक किंवा डेमोक्रॅटिक कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तेथे इस्राइलला पाठिंब्याचा निर्णय घेतला जातो.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलTerror Attackदहशतवादी हल्ला