शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

'दाऊद पाकिस्तानात असला तर असू दे, भारताला मदत करण्याचा काय संबंध?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 13:29 IST

दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे

इस्लामाबाद, दि. 31 - दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे. तसं पहायला गेलं तर परवेझ मुशर्रफ यांनी एकाप्रकारे अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचं मान्य केलं आहे. पाकिस्तानमधील चॅनेलला मुलाखत देताना परवेझ मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

मुलाखतीत बोलताना परवेझ मुशर्रफ यांनी दाऊद इब्राहिमला पाठिंबा देताना, 'भारतात मुस्लिमांची हत्या होते, आणि दाऊद त्यावर प्रतिक्रिया देतो', असंही म्हटलं आहे. 'भारत गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानला बदनाम करत आहे. आता आम्ही लगेच चांगले वागून भारताला मदत करण्याचा काय संबंध ? दाऊद कुठे आहे मला माहित नाही. तो येथेच कुठेतरी असू शकतो', असं परवेझ मुशर्रफ बोलले आहेत. 

भारताने अनेकदा दाऊद पाकिस्तानात वास्तव्य करत असल्याचा पुरावा दिला आहे. मात्र भारताने पुरावे देऊनही पाकिस्तानने वारंवार त्याचा आमच्या देशात ठावठिकाणा नसल्याचा दावा केला आहे. दाऊद कराचीत राहत असल्याचा दावा भारताने केला असून, तसे पुरावेही सादर केले आहेत. 

दाऊद इब्राहिम तीन पत्ते आणि 21 नावांनिशी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या पत्त्यावर आणि 21 नावांनिशी राहत असल्याची माहिती समोर आली होती. इंग्लंडच्या महसूल विभागाने ही माहिती उघड केली होती. मोस्ट वॉण्टेड दहशतवादी म्हणून ७ नोव्हेंबर २००३ मध्ये दाऊदविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर तो पाकिस्तानमध्येच वास्तव्यास असल्याते समोर आले आहे.

गेल्या वर्षी लंडनमधील महसूल विभागाने दाऊदची आर्थिक नाकेबंदी करताना त्याच्या लंडनमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडकडून दाऊदला असेट्स फ्रीज लिस्टमध्ये टाकले आहे. यामध्ये दाऊदच्या पाकिस्तानमधील तीन पत्त्याचा आणि 21 नावांचा समावेश आहे. इंग्लंडच्या वित्त मंत्रालयाने 'फायनँशियल सेक्शन्स टार्गेट्स इन द यूके' या नावाने यादी जारी केली आहे. यामध्ये दाऊद इब्राहिम कासकर या नावाने खोली क्रमांक ३७, डिफेन्स रोड, हाऊसिंग अ‍ॅथॉरिटी, कराची, पाकिस्तान. तर दुसरा पत्ता खोली क्रमांक २९, मरगाला रोड, एफ ६-२ स्ट्रीट नंबर २२, कराची, पाकिस्तान. नूरबाद, पाकिस्तान, कराची, (त्याशिवाय पाकिस्तान पलातियाल बंगला, हिल परिसर) आणि व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, किल्फटन, कराची, पाकिस्तान. असे गोंधळवून टाकणारे पत्ते त्याने दिले आहेत.

दाऊदचं राष्ट्रीयत्व भारतीय असून त्याचा पासपोर्ट भारताने रद्द केल्यानंतर त्याने भारतीय व पाकिस्तानी अनेक बनावट पासपोर्ट केले व त्याचा गैरवापर केला आहे, असेही यात म्हटले होते. 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊद मुख्य आरोपी आहे. 12 मार्च 1993 रोजी 13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद