शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पाकिस्तानने जगासमोर आणली सतराशे वर्षांपूर्वीची गौतम बुद्धांची मूर्ती  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 4:28 PM

पाकिस्तानने नुकतीच सतराशे वर्षांपूर्वीची एक प्राचीन बौद्धमूर्ती जगासमोर आणली आहे.

इस्लामाबाद - भारतासह आशिया खंडातील बहुतांशा भागांमध्ये प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या खुणा आढळत असतात. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही प्राचीन बौद्धकालीन अवशेषांचे अद्याप अस्तित्व आहे. पाकिस्तानने नुकतीच सतराशे वर्षांपूर्वीची एक प्राचीन बौद्धमूर्ती जगासमोर आणली आहे. धार्मिक सदभावना वाढावी तसेच पाकिस्तानमधील पर्यटनास चालना मिळावी, या उद्देशाने ही बुद्धमूर्ती प्रकाशझोतात आणण्यात आली आहे.  तेव्हाच्या अखंड भारतातील आणि आता पाकिस्तानमध्ये असलेल्या  भामला प्रांतात 1929 साली बौद्ध संस्कृतीचा वारला असलेले अवशेष सापडले होते. दरम्यान, आता तब्बल 88 वर्षांनंतर हा ठेवा जगासमोर आणण्यात आला आहे. येथे आढळलेली बुद्धाची मूर्ती भग्नावस्थेत आहे. ही भव्यमूर्ती 14 मीटर (48 फूट) उंच आहे. ही मूर्ती कांजूर दगडात कोरलेली आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्षनेते  इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या मूर्तीचे अनावरण करण्याकत आले.  "ही बुद्धमूर्ती इस तिसऱ्या शतकातील आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात जुनी बुद्धमूर्ती ठरते, असे भामला पुरातत्त्वीय विभाग आणि संग्रहालयाचे संचालक अब्दुल समद यांनी सांगितले. बुद्धांसंदर्भातील 500 वस्तू आम्ही शोधल्या असून, त्यापैकी ही एक मूर्ती आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र या प्राचीन बुद्धमूर्तीच्या अनावरणाला विरोधाचा सामनाही करावा लागला होता. काही गटांनी महामार्ग रोखत या मूर्तीच्या अनावरणाचा निषेध नोंदवला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग ( नवाझ) या पक्षाचे कार्यकर्तेही होते. देशातील गैर मुस्लीम वारशांचे जतन करण्याच्या सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तानमधील कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य केले जात आहे.  दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जानेवारी महिन्यामध्ये पाकिस्तानमधील प्राचीन हिंदू मंदिर असलेल्या कटास राड मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBuddha Cavesबौद्ध लेणी