शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सापडलेल्या बोटांवरून हल्लेखोराला ओळखले

By admin | Updated: November 16, 2015 03:49 IST

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या आजवरच्या सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाची चक्रे इतरही युरोपीय देशांमध्ये वेगाने फिरू लागली आहेत.

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या आजवरच्या सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाची चक्रे इतरही युरोपीय देशांमध्ये वेगाने फिरू लागली आहेत. ठार झालेल्या सातपैकी एका हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर फ्रेंच पोलिसांनी त्याच्या वडील आणि भावाला अटक केली. बेल्जियममध्येही एकाच कुटुंबातील सहा जणांची धरपकड करण्यात आली असून, जर्मनीतही एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.सर्वाधिक ८९ निरपराध जेथे मारले गेले त्या बेटॅक्लॉ हॉलवर हल्ला करणाऱ्यांपैकी एक उमर इस्माईल मुस्तेफई नावाचा २९ वर्षांचा अल्जिरियन वंशाचा फ्रेंच नागरिक होता, असे पॅरिस पोलिसांनी जाहीर केले आहे. बेटॅक्लॉ हॉलमध्ये सापडलेल्या बोटांच्या ठशांद्वारे त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. पॅरिसच्या कोरकोरोनस या उपनगरात जन्मलेल्या मुस्तफई याला तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्याच्यावर किरकोळ आठ गुन्ह्यांची नोंद आहे; पण तो कधीही जेलमध्ये गेला नव्हता. बेटॅक्लॉ हॉलमध्ये सापडलेल्या बोटाचे ठसे पोलीस फाईलमध्ये असलेल्या ठशांशी जुळतात.पॅरिसचे प्रॉसिक्युटर फ्रान्स्वा मोलिन्स यांनी सांगितले की, कट्टरपंथी असल्याने २०१० मध्ये तो अधिकाऱ्यांच्या रडारवर आला होता; पण आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी नेटवर्कमध्ये तो अडकला नव्हता. त्याच्या पित्याला आणि भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुस्तफई याचे हे कृत्य म्हणजे मूर्खपणा आणि वेडेपणा असल्याचे त्याच्या भावाने सांगितले.या हल्ल्याचा तपास आता फ्रान्सच्या बाहेरही चालू असून, बेल्जियम पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण हल्ल्याच्या वेळी पॅरिसमध्ये उपस्थित होता. बेटॅक्लाँ हॉलजवळ आढळलेल्या मोटारीशी संबंधित ही धरपकड असल्याचे पोलिसांनी सांगितले.बेवारस कारमध्ये शस्त्रास्त्रेयाच घटनाक्रमाशी निगडित अन्य एका घडामोडीत पॅरिसमधीलच एका उपनगरात बेवारस कार सापडली असून, त्यात हल्ल्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या अनेक एके-४७ यासारख्या शस्त्रास्त्रांसह अनेक शस्त्रे सापडली आहेत. हल्लेखोरांनी अनेक ठिकाणी या कारचा वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.(वृत्तसंस्था)स्तंभित जगाचा पाठिंबाया हल्ल्याने संपूर्ण जग स्तब्ध झाले असून, फ्रान्सला पाठिंबा देण्यासाठी लंडनमधील टॉवर ब्रिज, बर्लिनमधील ब्रँडेनबर्ग गेट, न्यूयॉर्कस्थित विश्व व्यापार केंद्रासह अनेक ठिकाणी फ्रान्सच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाने रोषणाई करण्यात आली.——————ही इस्लामविरोधी लढाई नाहीब्रुसेल्स : पॅरिसवर झालेले हल्ले म्हणजे कट्टरवादी आणि लोकशाही मूल्य मानणारे समर्थक यांच्यातील संघर्ष असून, तो इस्लाम आणि पाश्चिमात्य देशांची लढाई नाही, असे नाटोप्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी म्हटले आहे.एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत आता ‘इसिस’ विरुद्ध मुस्लिम लोकच लढाईचे नेतृत्व करीत आहेत. कारण ‘इसिस’च्या दहशतवादाचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसत आहे. त्यामुळे हा संघर्ष इस्लामी जग आणि पाश्चिमात्य देश यांच्यातील नाही.