शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:25 IST

अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना मोहिमेत २७८ दिवसांचा ओव्हरटाइम करावा लागला

वॉशिंग्टन: अवकाशातून परतलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना मोहिमेदरम्यान झालेल्या ओव्हरटाइमचे पैसे मी हवे तर माझ्या खिशातून भरेन, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अवकाशात गेले होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अवकाशात २८६ दिवस अडकून पडावे लागले होते. अवकाशात नऊ महिने घालवल्यानंतर ते या आठवड्यात पृथ्वीवर सुखरूप परतले. त्यांना मोहिमेत २७८ दिवसांचा ओव्हरटाइम करावा लागला होता.

राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?

ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना अंतराळवीरांना कराव्या लागलेल्या ओव्हरटाइमबाबत छेडले. अंतराळात अडकून पडावे लागल्याने त्यांना काही वाढीव वेतन दिले जाणार आहे का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कुणीही कधी मला याबाबत काहीही सांगितलेले नाही. पण अंतराळवीरांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागत असतील तर मी स्वत:च्या खिशातून देईन.

इलॉन मस्क यांचेही मानले आभार

  • बचाव दलाने या दोघांना या आठवड्यात स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलने पृथ्वीवर परत आणले. ट्रम्प यांनी टेस्ला, स्पेसएक्सचे प्रमुख आणि गव्हर्नमेंट एफिशियन्सी डिपार्टमेंटचे प्रमुख उद्योगपती इलॉन मस्क यांचेदेखील आभार मानले.
  • ट्रम्प म्हणाले की, मला वाटते आपल्याकडे मस्क नसते तर? या दोघांना तिथे आणखी बराच काळ अडकून पडावे लागले असते. त्यांना तिथून परत आणण्यासाठी मग कोण गेले असते?
  • प्रसारमाध्यमांच्या एका प्रतिनिधीने ट्रम्प यांना माहिती दिली की, या दोघांना अवकाशात घालवलेल्या प्रत्येक दिवसासाठी ५ डॉलर प्रतिदिन प्रमाणे १,४३० डॉलरचे जादा वेतन दिले आहे. अंतराळवीरांना नासाच्या इतर अंतराळवीरांप्रमाणेच वेतन मिळते. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४० तास काम करावे लागते. ओव्हरटाईम, शनिवार-रविवार किंवा सुट्ट्यांसाठी जादा पैसे मिळत नाहीत.

दोघांना किती पैसे मिळाले?

नासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अंतराळीवीरांना वार्षिक १,५२,२५८ डॉलर इतके वेतन दिले जाते. अवकाशातील मोहिमेतील ओव्हरटाइममुळे त्यांना २८६ दिवसांसाठी १,४३० डॉलर इतके अधिक वेतन देण्यात आले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNASAनासाSunita Williamsसुनीता विल्यम्स