शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'पाकिस्तानी पत्रकार मला खूप आवडतात, अमेरिकेपेक्षाही भारी आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 14:35 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

ठळक मुद्देकाश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

पाकिस्तानी पत्रकार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या रिपोर्टींगमुळे तर कधी आपल्या निवेदनामुळे पाकिस्तानी पत्रकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र, आता खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच पाकिस्तानी पत्रकारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे आश्चर्य होत आहे. पण, ट्रम्प यांचे हे शब्द कौतुकाचे आहेत, की टोला याबाबत अनेकजण विविध अर्थ काढत आहेत. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेतील मीडिया भ्रष्टाचारी असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही उभय देशांतील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दहशतवाद, व्यापार, अफगानिस्तान यांसह काश्मीरच्या मुद्द्यावरुनही ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी, पत्रकारांना प्रतिप्रश्न करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आर यू फ्रॉम पाकिस्तान? असा सवाल केला. त्यानंतर मला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतात. मला 2-4 पाकिस्तानी पत्रकार हवे आहेत. मला पाकिस्तानी पत्रकार हे अमिरेकन पत्रकारांपेक्षा अधिक आवडतात, असेही ट्रम्प यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. त्यामुळे चक्क पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच ट्रम्प यांनी पाकिस्तानी मीडियाची खिल्ली उडवल्याच्या प्रतिक्रिया ट्विटर आणि सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. दरम्यान, जेमी मॅकलेलन या कॉमेडियनने ट्रम्प यांच्या या संवादाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यावरही मजेशीर कमेंट पाहायला मिळत आहेत.बजरंगी भाईजान या चित्रपटातही पाकिस्तानच्या पत्रकाराची भूमिका नवाजुद्दीन सिद्दिकीने निभावली होती. त्यावेळीही, पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. 

दरम्यान, काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, हा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. तसेच काश्मीर प्रश्नासह भारत आणि पाकिस्तानमधील अन्य विवादांवर द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढला गेला पाहिजे, या आपल्या जुन्या भूमिकेचाही परराष्ट्र मंत्रालयाकडून पुनरुच्चार करण्यात आला. नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलाही भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान