शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 00:09 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. ट्रम्प म्हणाले की, "पंतप्रधान मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत, मी कालच त्यांच्याशी बोललो आणि आम्ही आणखी एक नवीन करार करणार आहोत." विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे हे विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आले आहे.

भारत-पाकिस्तान वादावर ट्रम्प यांचे विधानट्रम्प यांना पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले की, "मला पाकिस्तान आवडतो, पण मला वाटते की, मोदी एक अद्भुत महान व्यक्ती आहेत." ते पुढे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात पाकिस्तानच्या वतीने असीम मुनीर यांनी, तर भारताच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी खूप प्रभावी भूमिका बजावली. "दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रे आहेत, मी दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना लढण्यापासून रोखले," असे ट्रम्प यांनी नमूद केले.

मोदींशी फोनवर चर्चा आणि अमेरिकेत थांबण्याचे आवाहनइराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ट्रम्प जी७ शिखर परिषद अर्ध्यावरच सोडून वॉशिंग्टनला परतले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी त्यांना विचारले होते की, कॅनडाहून परतताना ते अमेरिकेत थांबू शकतात का? 

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे असमर्थता व्यक्त केली. फोन संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी असेही सांगितले की, अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय दोन्ही सैन्यांमध्ये थेट संवाद झाला आणि त्यानंतर लष्करी हालचाली थांबवण्यात आल्या.

आम्ही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही!भारताने नेहमीच स्पष्ट केलं आहे की, आम्ही कोणत्याही मध्यस्थीला स्वीकारणार नाही. पाकिस्तानच्या विनंतीवरून भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये चर्चा सुरू झाल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं.

'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानचा दावापहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने ६ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं होतं. यात पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस जोरदार चकमकी झाल्या आणि १० मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्याचा करार झाला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतरच पाकिस्तानला युद्ध थांबवण्याची विनंती करावी लागली.

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय सीमा तोडल्याचा आरोप केला. यासोबतच, त्यांनी इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी