शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय असून भारताबाबतच वाईट बोललेल्या; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 11:48 IST

सुएला 43 दिवसांपासून यूकेच्या गृहमंत्री आहेत. ड्यूक ऑफ वेलिंग्टन नंतर त्या सर्वाधिक कमी काळ या पदावर राहिलेल्या मंत्री ठरल्या आहेत.

ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री आणि अनिवासी भारतीय असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीयांविरोधात वक्तव्य केले होते. आता त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला विरोध केला होता. एकाच आठवड्याच्या अंतराने दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने नुकतेच सत्तेत आलेल्या लिझ ट्रस सरकारला धक्का बसला आहे. 

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते. यानंतर लगेचच त्यांच्या भारतातूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या व गृहमंत्री झालेल्या  ब्रेव्हरमन यांनी याविरोधात वक्तव्य केले होते. आता सुएला यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्रस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुएला यांच्या राजीनाम्यापूर्वी चीफ व्हीप वेंडी मॉर्टन आणि त्यांचे डेप्युटी क्रेग व्हिटेकर हे देखील सरकारमधून बाहेर पडल्याचे बोलले जात होते. काही तासांच्या चुप्पीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून ते आपल्या पदावर कायम असल्याचे सांगण्यात आले. 

सुएला यांच्यावर स्थलांतरितांशी संबंधित सरकारी दस्तऐवज प्रकाशित होण्यापूर्वीच ती कागदपत्रे सहकारी खासदाराला पाठवल्याचा आरोप आहे. यामुळे आपल्या वैयक्तिक ईमेलच्या गैरवापरामुळे मंत्री पद सोडत असल्याचे ब्रेव्हरमन कारण दिले आहे. तर दुसरीकडे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांच्या दबावामुळे ब्रेव्हरमन यांना काढून टाकण्यात आल्याचे काही खासदारांचे म्हणणे आहे. नुकतीच अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांचीही हकालपट्टी करण्यात आली होती, त्यांच्याजागी जेरेमी हंट आले होते. 

आम्ही चुका केल्या नाहीत असे भासवतोय. लोकांना असे वाटतेय जादूने आपोआपच या चुका सुधरतील. माझ्याकडून चूक झाली असून जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत आहे. आपण कठीण काळातून जात आहोत हे सर्वांनाच माहीत आहे. मला या सरकारची चिंता आहे. आम्ही आमच्या मतदारांना दिलेली आश्वासने मोडली आहेत, असे सुएलांनी म्हटले आहे. सुएला 43 दिवसांपासून यूकेच्या गृहमंत्री आहेत. ड्यूक ऑफ वेलिंग्टन नंतर त्या सर्वाधिक कमी काळ या पदावर राहिलेल्या मंत्री ठरल्या आहेत. ड्यूक ऑफ वेलिंग्टन हे 1834 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यासाठी ब्रिटनचे गृहमंत्री होते.