शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'मी राजकीय नेत्याचे नाव घेतलेच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:37 IST

हेलिकॉप्टर घोटाळा; ख्रिश्चन मिशेलचा न्यायालयात अर्ज

नवी दिल्ली : मी कोणाचेही नाव घेतलेले नाही, असा खुलासा अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेल याने शुक्रवारी न्यायालयापुढे केला. ईडीने मिशेलविरुद्ध न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. चौकशीत मिशेलने काही राजकीय नेत्यांची नावे घेतल्याचा दावा ‘ईडी’ने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

केंद्र सरकार ‘ईडी’सारख्या संस्थांचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी करीत असल्याचा आरोप मिशेलने केला. मिशेलने काही नेत्यांची नावे घेतल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये असल्याचे वृत्त पसरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी काँग्रेसचे अहमद पटेल व गांधी कुटुंबियांविरोधात टीकास्त्र सोडले होते. त्याने पटेल व गांधी कुटुंब यांना लाच दिल्याचे म्हटले असल्याचे भाजप नेते सांगत फिरत होते. त्यानंतर मिशेल याने न्यायालयात अर्ज केला. पूर्वीचे सरकार, संरक्षण दलातील अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी आणि पत्रकार यांना या वादग्रस्त सौद्यामध्ये लाभ झाल्याचे मिशेल याने चौकशीत कबूल केल्याचे ईडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटले होते.विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी शनिवारी पुढील सुनावणी ठेवली असून, मिशेलच्या अर्जाविषयी ईडीला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.केवळ खळबळ निर्माण करण्यासाठीमिशेलने ईडीच्या चौकशीत कोणाचेही नाव घेतलेले नाही. केवळ खळबळ निर्माण करण्यासाठी त्याने राजकीय नेत्यांची नावे घेतल्याचे वृत्त पसरवून आपल्या अशिलावरील आरोप भक्कम करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे मिशेलचे वकील अ‍ॅड. ए. के. जोसेफ यांनी न्यायालयास सांगितले. दोषारोपपत्र गुरुवारी दाखल झाले. मिशेल याला त्याची प्रत मिळण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना ती देण्यात आली, असा दावा जोसेफ यांनी केला. दोषारोपपत्राची दखल न्यायालयाने घेण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Agusta Westland Scamअगुस्ता वेस्टलँड घोटाळाdelhiदिल्ली