एकीकडे भारत-पाकिस्तान युद्ध भडकण्याची चिन्हे असताना गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धाबाबत भारतासाठी धक्कादायक माहिती आली आहे. युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे हवेत उडणारे रशियाचे सुखोई ३० मिसाईल डागून नेस्तनाभूत केले आहे. समुद्री ड्रोन बोटीद्वारे सुखोई ३० पाडून युक्रेन पुन्हा चर्चेत आला आहे. भारताकडेही रशियन बनावटीची सुखोई लढाऊ विमाने आहेत.
गेल्या शुक्रवारी युक्रेनच्या विशेष युनिट 'ग्रुप १३' ने रशियन बंदर शहर नोव्होरोसियस्कजवळ सुखोई लढाऊ विमान पाडले. क्षेपणास्त्राने सुसज्ज असलेल्या मागुरा व्ही५ मरीन ड्रोनने हे विमान पाडण्यात आले. समुद्री ड्रोन म्हणजे मानवरहित छोटी बोट, त्यावर मिसाईल सज्ज होती. लढाऊ विमान हवेतून जात होते, त्यावर निशाना साधून हा हल्ला केला गेला. ही गोष्ट जर युक्रेनने नुसतीच जाहीर केली असती तर कोणी विश्वास ठेवला नसता, परंतू ड्रोनवर असलेल्या कॅमेराने ही घटना कैद केली आहे. यामुळे जगाला धक्का बसला आहे.
युक्रेनियन ड्रोनने रशियाच्या SU-30 लढाऊ विमानावर आपले लक्ष्य रोखले. त्यानंतर ड्रोनने लढाऊ विमानावर क्षेपणास्त्र डागले आणि मोठा स्फोट झाला. या लढाऊ विमानाचे हवेतच तुकड़े तुकडे झाले. हे जेट काळ्या समुद्रात पडले. युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे हे साध्य केल्याने जगभरातील सैन्यांना धक्का बसला आहे. समुद्रातील युद्ध आता एका नवीन युगात प्रवेश करत आहे, असे युक्रेनने म्हटले आहे.
या समुद्रात असलेल्या मालवाहू जहाजांनी पायलटला बुडताना वाचविले आहे. हे ड्रोन युक्रेनच्याच मुख्य गुप्तचर संचालनालयासाठी (एचयूआर)ने विकसित केले आहे. मागुरा व्ही५ हे आपल्यासोबत २०० ते ३२० किलोग्रॅम स्फोटके किंवा इतर उपकरणे वाहून नेऊ शकते. R-73 ही हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे देखील वाहून नेऊ शकते. ८०० किलोमीटरपर्यंत हा ड्रोन लक्ष्यभेद करू शकतो. मागुरा व्ही५ ने रशियन नौदलाला देखील सळो की पळो करून सोडले आहे.