शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचं तिकीट काढावं लागू नये म्हणून पती-पत्नीने विमानतळावर सोडलं बाळाला, पळून गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:00 IST

मुलाचं वेगळं तिकीट खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर एका जोडप्याने बाळाला विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाचं वेगळं तिकीट खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर एका जोडप्याने आपल्या बाळाला इस्रायल विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना रायनियर एअर डेस्कच्या तेल अवीव बेन-गुरियन विमानतळावर घडली. मुलाकडे तिकीट नव्हतं आणि पालक मुलाशिवाय फ्लाइटमध्ये चढले. स्थानिक वृत्त आउटलेट्सनुसार, ही जोडी बेल्जियन पासपोर्टवर ब्रसेल्सला जात होती जेव्हा त्यांना कळले की त्यांना मुलाच्या तिकिटासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

रायनियर एयरने सांगितले की या जोडप्याने मुलाचे तिकीट आधी खरेदी केले नव्हते. विमानतळ कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मुलाला डेस्कजवळ बेबी स्ट्रॉलरमध्ये सोडले आणि पासपोर्ट नियंत्रणासाठी पुढे गेले. CNN ला दिलेल्या निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की, "तेल अवीव ते ब्रुसेल्स (31 जानेवारी) प्रवास करणाऱ्या या प्रवाशांनी आपल्या मुलाचं बुकिंग न करता चेक-इन केले."

"कपलने मुलाला चेक-इनवर सोडले आणि पुढे गेले. चेक-बेन गुरियन विमानतळावर, एजंटने विमानतळ सुरक्षेशी संपर्क साधला, ज्यांनी या प्रवाशांना परत बोलावले आणि हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे पाठवले." याच दरम्यान, इस्रायल विमानतळाच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी आउटलेटला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "बेल्जियन पासपोर्ट असलेले जोडपे एका मुलासह टर्मिनल 1 वर त्यांच्या मुलाच्या तिकिटाशिवाय फ्लाइटसाठी आले होते. जोडप्याला फ्लाइटसाठी उशीर झाला होता."

"जोडप्याने बाळाची ट्रॉली बाळासह तेथेच सोडली आणि फ्लाइटसाठी बोर्डिंग गेटवर जाण्याच्या प्रयत्नात टर्मिनल 1 च्या दिशेने धाव घेतली." पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रकरण निवळल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, मूल आई-वडिलांकडे आहे त्यामुळे आता पुढील तपास होणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Airportविमानतळ