शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

किचनमध्ये सीक्रेट कॅमेरा लावून पतीने डॉक्टर पत्नीला पकडलं रंगेहाथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:12 IST

जॅक काही दिवसांपासून आजारी होता. त्यांना संशय आला की, पत्नी त्यांच्या ड्रिंकमध्ये नाली साफ करण्यासाठी वापरलं जाणारं Drano हे विषारी केमिकल मिक्स करत आहे. 

एका पतीला संशय आला की, पत्नी त्याच्या ड्रिंकमध्ये विषारी पदार्थ मिक्स करून त्याला देत आहे. त्यानंतर त्याने लपून घरातील किचनमध्ये एक कॅमेरा लावला आणि  पत्नीला रंगेहाथ पकडलं. ही माहीत कोर्टात एका केससाठी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे. ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आहे. न्यूयॉर्क पोस्टला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, स्कीन स्पेशालिस्ट डॉक्टर यू एमिली यूवर लक्ष ठेवण्यासाठी तिचा पती जॅक चेनने किचनमध्ये लपून कॅमेरा लावला. ते दोघेही 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 

जॅक काही दिवसांपासून आजारी होता. त्यांना संशय आला की, पत्नी त्यांच्या ड्रिंकमध्ये नाली साफ करण्यासाठी वापरलं जाणारं Drano हे विषारी केमिकल मिक्स करत आहे. 

जॅकने पोलिसांना हे सीसीटीव्ही फुटेज दिलं. यानंतर एमिलीला तिच्याच ऑफिसमधून 4 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर साधारण 24 लाखांच्या बॉन्डवर तिला सोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, जॅकचा दावा आहे की, पत्नी त्याना आणि मुलांना बऱ्याच दिवसांपासून शारीरिक व मानसिक त्रास देत होती. 

जॅकने कोर्टात सांगितलं की, एमिलीला जेव्हा राग येतो तेव्हा ती मुलांवर ओरडू लागते. सामान्यपणे एमिली मुलांना शिव्याही देत होती. पोलिसांनी सांगितलं की, नाली साफ करणारं केमिकल प्यायल्याने शरीराच्या आत जॅकचं मोठं नुकसान होत होतं. जॅकने मागणी केली त्याना आता घटस्फोट हवा आहे. 

2011 मध्ये जॅकची भेट एमिलीसोबत झाली होती आणि दुसऱ्या वर्षी दोघांनी लग्न केलं होतं. जॅकने दावा केला की, 2013 आणि 2014 मध्ये दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांना एमिलीमध्ये बदल दिसून येत होता. जॅकने हेही सांगितलं की, बऱ्याच महिन्यांपासून दोन्ही मुलांना त्रास दिला जात आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी