शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

एका 'खास' ऑफरसाठी नवऱ्याने बायकोला विमानप्रवासातच सोडलं, प्रॉमिस डेच्याच दिवशी मोडलं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:28 IST

आज प्रॉमिस डे. पण एका नवऱ्याने मात्र प्लेनमधील एका ऑफरसाठी विमान प्रवासात आपल्या बायकोची साथ सोडली. तिला एकटं टाकून तो पळाला. प्रॉमिस डेच्याच दिवशी त्यानं जन्मोजन्मी साथ देण्याचं प्रॉमिस मोडलं.

नवरा-बायको (Husband wife news) म्हणजे एकमेकांचे आयुष्याचे सोबती. जीवनाच्या प्रवासात ते एकत्र असतात. सुखदुःखात कायम एकमेकांची साथ देतात. लग्नाच्या वेळी सात जन्म सोबत राहण्याचं वचन देतात. आणि त्यात आज प्रॉमिस डे. पण एका नवऱ्याने मात्र प्लेनमधील एका ऑफरसाठी विमान प्रवासात आपल्या बायकोची साथ सोडली. तिला एकटं टाकून तो पळाला. प्रॉमिस डेच्याच दिवशी त्यानं जन्मोजन्मी साथ देण्याचं प्रॉमिस मोडलं.

हे कपल एकत्र सुट्ट्या एन्जॉय करायला निघालं. महिनाभरासाठी ते जपानहून अमेरिकेला जात होतं. आता नवरा-बायको एकत्र प्रवास करणार म्हणजे त्यांनी काही ना काही रोमँटिक स्वप्नं रंगवलेलीच असतात. पतीसोबत प्रवासाला निघालेल्या या महिलेनेही अशीच स्वप्नं रंगवली होती. पण तिच्या पतीने ही स्वप्नं धुळीत मिळवली आणि याला कारण ठरलं विमान प्रवासात त्याला मिळालेली एक ऑफर. (Husband left wife alone for offer in flight)

तब्बल १२ तासांचा हा विमान प्रवास होता. दोघंही फ्लाइटच्या इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होते. प्रवासाची सुरुवात आनंदात झाली.  पण मध्येच एक ऑफर आली. पतीला आपली सीट अपग्रेड करून बिझनेस क्लासमध्ये बसून प्रवास करण्याची संधी मिळाली. मग काय पतीने या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. त्याने मागचापुढचा कोणताच विचार केला नाही आणि इकोनॉमी क्लास सोडून बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तो आपल्या बायकोपासून वेगळा झाला, तिच्यापासून दूर बसला. आपली बायको एकटी राहिला याचं त्याला काहीच वाटलं नाही.

साहजिक फक्त एका नको त्या ऑफरसाठी आपल्या पतीने प्रवासात असं आपल्याला एकटीला सोडलं, हे कोणत्याच महिलेला सहन होणार नाही. ही महिलाही तशीच संतप्त झाली. नवऱ्यासोबत १२ तास एकत्र विमान प्रवास करणार अशी प्लॅनिंग पत्नीने केली. पण पतीला बिझनेस क्लासची भुरळ पडल्याने तिचा हा प्लॅन फेल झाला. तिचा पूर्ण प्रवास खराब झाला.

पतीच्या मते, १२ तासांचा फ्लाइटचा प्रवास हा रात्रीचा होता. आम्ही दोघंही झोपलोच असतो. त्यामुळे वेगवेगळं बसल्याने तसा काहीच फरक पडत नाही. त्याने आपला हा प्रवास रेडिटवर शेअर केला आहे आणि लोकांचं मत जाणून घेतलं. बहुतेक युझर्सनी त्याच्या पत्नीलाच योग्य ठरवलं आहे. पत्नीला प्रवासात असं एकटं सोडून गेल्याने त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाJapanजपानairplaneविमानAirportविमानतळ