शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Husband & wife: रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर पती पत्नीला विसरला, कार घेऊन १६० किमी पुढे गेला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:33 IST

Husband & wife: कारने सोबत जात असताना एक पती सुनसान रस्त्यावर पत्नीला विसरून तब्बल १६० किमी पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बाजारात फिरताना, प्रवासाला जाताना पती-पत्नींपैकी कुणीतरी एकमेकांना विसरून पुढे गेल्याचा प्रकार तुमच्यासोबतही घडला असेल. मात्र कारने सोबत जात असताना एक पती सुनसान रस्त्यावर पत्नीला विसरून तब्बल १६० किमी पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती विसरून पुढे गेल्याने पत्नीला सुमारे २० किमी चालत पुढे यावे लागले. अखेरीस पतीला एक फोन आला, त्यानंतर पत्नी कारमध्ये नसल्याचे पतीला समजले.

हा धक्कादायक प्रकार थायलंडमधील महासराखम प्रांतात घडला आहे. ५५ वर्षीय बुंटोम चाईमून त्यांची ४९ वर्षांची पत्नी एमुनाए चाईमून यांना घेऊन २५ सप्टेंबर रोजी रोड ट्रिपवर गेले होते. यादरम्यान, पती बुंटोम हे वाटेत वॉशरूममध्ये गेले. ते परत आले तेव्हा त्यांनी पत्नी कारमध्ये मागच्या सीटवर झोपली आहे, असं समजून त्यांनी कार सुरू केली आणि पुढे निघून गेले. मात्र ते बाहेर गेले असताना त्यांच्या पत्नीही नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेल्या होत्या. मात्र त्यांनी पतीला कल्पना दिली नव्हती.

पत्नी जेव्हा परत आली तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचे पती कारसह तिथून निघून गेले आहेत. अंधार आणि सुमसान रस्ता पाहून त्या घाबरल्या. त्यानंतर रात्री अंधारात सुमारे २० किमी चालत राहिल्या. पहाटे ५ वाजता त्या स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांना त्यांच्या पतीचा मोबाईल नंबर आठवत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोलिसांकरवी आपल्या मोबाईलवर फोन करून पाहिला. मात्र पतीने फोनच उचलला नाही.

त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या नातेवाईकांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला. या सर्वामध्ये सकाळचे आठ वाजले. अखेर पोलिसांना या महिलेच्या पतीशी संपर्क झाला. तोपर्यंत ते १६० किमी लांब गेले होते. 

दरम्यान, आपण पत्नीला सोडून खूप लांब आलो असल्याची जाणीव पतीला झाली. त्यानंतर त्यांनी कार यूटर्न केली आणि पत्नीला परत आणण्यासाठी परतले. पत्नीने सांगितले की, आमच्या विवाहाला २७ वर्षे झाली आहेत. आम्हाला एक मुलगा आहे.  परत आलेल्या पतीला पोलिसांनी एवढा वेळ तुम्ही पत्नीला पाहिले नाही का अशी विचारणा केली. पोलिसांचा प्रश्न ऐकून पती खजील झाला. ते म्हणाले की, मला वाटले पत्नी मागच्या सिटवर आहे आणि ती झोपली असावी. दरम्यान, पत्नीजवळ आल्यावर पतीने तिची माफी मागितली.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारThailandथायलंडJara hatkeजरा हटके