शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक अन् दुर्दैवी! व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं तब्बल 40 किलो प्लास्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 11:50 IST

प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे

मनीला: फिलिपिन्समध्ये एका व्हेल माशाचा भूकेनं मृत्यू झाला आहे. या माशाच्या पोटात तब्बल 40 किलो प्लास्टिक मिळालं आहे. या कचऱ्यामुळे व्हेल मासा काहीच खाऊ शकला नसावा, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. पोटात प्लास्टिक गेल्यानं मासा आजारी होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. प्लास्टिक पोटात गेल्यानं माशाचा मृत्यू झाल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडल्या आहेत. मात्र ही घटना सर्वात गंभीर असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. फिलिपिन्सच्या दक्षिण भागातील कम्पोस्टेलामध्ये 4.7 मीटर लांबीच्या व्हेल माशाचा मृत्यू झाला. यानंतर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटना आणि प्रशासनाकडून शवविच्छेदन करण्यात आलं. यात माशाच्या पोटात तब्बल 40 किलो प्लास्टिक आढळून आलं. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, अन्नधान्यांच्या पोत्यांचा समावेश होता. 'प्लास्टिक कचरा खाल्ल्यानं व्हेल माशाला गॅसचा त्रास झाला. त्यामुळे माशाला आणखी काहीच खाता आलं नाही आणि त्याचा भूकबळी गेला. हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे,' असं डी बोन कलक्टर म्युझियमचे संचालक डॉरेल ब्लेचले यांनी सांगितलं. आम्ही गेल्या दहा वर्षांमध्ये 62 डॉल्फिन आणि काही व्हेल माशांचं शवविच्छेदन केलं आहे. मात्र याआधी कधीच कोणत्याही माशाच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडलं नाही, अशी माहिती ब्लेचले यांनी दिली. व्हेल मासा अतिशय कमजोर झाला होता. त्याला पोहण्यातही अडचणी येत होत्या, असं मत्स विभागाच्या संचालिका फातिमा इद्रिस यांनी सांगितलं. फिलिपिन्समध्ये प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर आहे. फिलिपिन्समध्ये पुनर्प्रक्रिया होणाऱ्या प्लास्टिकचा फारसा वापर केला जात नाही. केवळ एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्यानं पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटनांनी फिलिपिन्सचा समावेश महासागर प्रदूषित करणाऱ्या देशांमध्ये केला आहे.  

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण