वॉश्गिंटन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लॅविट त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जातात. ट्रम्प यांच्या विरोधकांची बोलती बंद करण्याची कुठलीही संधी त्या सोडत नाहीत. त्यातच एका देशाच्या पंतप्रधानांची नजर त्यांच्यावर पडली आणि पहिल्याच भेटीत ते कॅरोलाइन यांच्या कामावर फिदा झाले. या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच त्यांच्या प्रेस सेक्रेटरीला मोठी ऑफर दिली. ही ऑफर ऐकून ट्रम्पही हैराण झाले, त्यानंतर हसत हसत कॅरोलाइनकडे पाहत म्हणाले, आम्हाला सोडून प्लीज जाऊ नकोस...
व्हाइट हाऊसच्या एका पत्रकार परिषदेत कॅरोलाइन लॅविट ट्रम्प यांच्यावर लागलेल्या आरोपांवर उत्तर देत होती. त्यांनी माध्यमांनाच ट्रम्प यांनी राबवलेली चांगली धोरणे यांना प्रसिद्धी न दिल्याबद्दल फटकारले. मागील ६ महिन्यापासून ट्रम्प यांनी सर्वात जास्त कर कमी करण्याचं काम केले. ज्यातून अमेरिकन जनतेच्या खिशातला पैसा वाचवता आला. अमेरिकन लोकांनी ज्या कामासाठी ट्रम्प यांची निवड केली, ते तेच काम करतायेत परंतु तुम्ही जाणुनबुजून त्याला प्रसिद्धी देत नाही. मागील सरकारने कशारितीने अमेरिकन जनतेला महागाईच्या संकटात टाकले त्याबाबतही तुम्ही बोलत नाही असं त्यांनी म्हटलं.
Trump यांच्यासमोर दिली ऑफर
कॅरोलाइन जेव्हा पत्रकारांशी संवाद साधत होती, तेव्हा ट्रम्प, जेडी वेंस यांच्याशिवाय हंगरीचे पंतप्रधान विक्टर ओरबनही तिथे उपस्थित होते. कॅरोलाइन यांच्यानंतर जेव्हा ट्रम्प यांनी बोलणं सुरू केले, तेव्हा विक्टर यांनी मध्येच अडवत त्यांच्या प्रेस सेक्रेटरीला हायर करण्याची ऑफर दिली. विक्टर यांनी ट्रम्प यांना म्हटलं की, मी यांना घेऊन जाऊ शकतो का, हे ऐकून ट्रम्पही हैराण झाले आणि हा बोलले. परंतु त्यानंतर पुन्हा हसत कॅरोलाइन, आम्हाला सोडून प्लीज जाऊ नकोस असं ट्रम्प यांनी मिश्किल टिप्पणी केली.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी तो शेअर केला. त्यावर कॅरोलाइननेही रिपोस्ट करत त्यांना प्रतिसाद दिला. तुमच्या विनम्र शब्दांसाठी मी आभार व्यक्त करते, परंतु मी इथेच राहू इच्छिते असं उत्तर दिले. यावर विक्टर यांनीही उत्तर दिले. "हे ऐकून वाईट वाटले, पण मला समजते. चांगले काम करत राहा." व्हाईट हाऊसमधील हा हलकाफुलका क्षण कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बनला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Web Summary : Hungarian PM Viktor Orban, impressed by Karoline Leavitt, offered her a job during a White House visit. Trump jokingly asked her to stay, creating a lighthearted moment after Leavitt defended Trump's policies against media criticism. Leavitt declined, reaffirming her commitment.
Web Summary : हंगरी के पीएम विक्टर ओरबन, कैरोलिन लेविट से प्रभावित होकर, व्हाइट हाउस की यात्रा के दौरान उन्हें नौकरी की पेशकश की। ट्रम्प ने मजाक में उनसे बने रहने को कहा। लेविट ने ट्रम्प की नीतियों का बचाव किया और अपनी प्रतिबद्धता की पुष्टि की।