शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus अमेरिकेत पन्नाशीच्या आतील शेकडो व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 05:58 IST

मृतांमधील किमान ७५९ या वयोगटातील : तिशीतील मृतांचे प्रमाणही लक्षणीय

वॉशिंग्टन : ज्यांचे वय साठीच्या पुढे आहे व ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा दमा यांसारखे जुनाट आजार आधीपासूनच आहेत, अशा व्यक्तींना कोरोना अधिक धोकादायक ठरतो, असे मानले जात असले तरी, अमेरिकेत जुनाट आजार नसलेल्या पन्नाशीच्या आतील शेकडो व्यक्तीही या महामारीला बळी पडल्याचे दिसून येत आहे.‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अग्रगण्य दैनिकाने अमेरिकेत बुधवारपर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता मृतांमधील किमान ७५९ व्यक्ती पन्नाशीच्या आतील होत्या व त्यांना वर उल्लेखिलेले आजारही आधीपासून नव्हते, असे निष्पन्न झाले. यावरून या महाभयंकर साथीची लागण झाल्यास मृत्यू कोणाला टळेल व कोणाला नाही याची खात्री देता येत नाही, हे स्पष्ट होते.वयाची विशीही न गाठलेल्या किमान नऊ जणांचाही या रोगाने बळी घेतला हेही लक्षणीय आहे. वयाचे एकेक दशक जसे पुढे जाते तसा मृत्यूचा धोकाही अधिक असल्याचेही या विश्लेषणावरून दिसते. आकडेवारीवरून असे दिसते की, मृतांपैकी ४५ व्यक्ती विशीतील, १९० तिशीतील तर ४१३ चाळिशीतील होत्या. विविध राज्यांनी मृतांची वयोगटानुसार वर्गवारी निरनिराळ््या पद्धतीने केलेली असल्याने नेमका निष्कर्ष काढणे कठीण असले तरी मृत्यू झालेले आणखी किमान १०२ पन्नाशीच्या आतील होते, असेही दिसते.सर्वच राज्ये वयोगटानुसार मृतांच्या आकडेवारीचे संकलन करीत नसल्याने व त्यात साथीचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांचाही समावेश असल्याने पन्नाशीच्या आतील मृतांचा आकडा याहूनही जास्त असण्याची शक्यता आहे.वयाची पन्नाशीही न गाठलेल्या पण कोरोनाला बळी पडलेल्यांची संख्या या साथीचा सर्वाधिक प्रकोप झालेल्या न्यूयॉर्क राज्यात व शहरात सर्वात जास्त असल्याचेही ही आकडेवारी दाखविते. तेथे विशीही न गाठलेल्या सहा, विशी ओलांडलेल्या ३३, तिशीमधील ११८, चाळिशीतील २६५ व्यक्ती कोरोनातून वाचू शकलेल्या नाहीत. (वृत्तसंस्था)भारतीय वंशाचे ११ नागरिक संसर्गाने दगावले४अमेरिकेत कोरोनाच्या साथीने आत्तापर्यंत मरण पावलेल्या १४ हजारांहून अधिक लोकांमध्ये मूळ भारतीय वंशाच्या ११ व्यक्तींचा समावेश आहे. याखेरीज या आजाराची लागण झालेले आणखी किमान १६ भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सध्या ‘सेल्फ क्वारंटाइन’मध्ये आहेत.४ मृत्यू झालेले हे सर्व भारतीय वंशाचे नागरिक पुरुष आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू न्यूयॉर्क व न्यूजर्सी या राज्यांमध्ये झाला आहे. फ्लोरिडा राज्यात एकाचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये मरण पावलेल्यांमध्ये चौघे टॅक्सी ड्रायव्हर होते, असेही समजते. कॅलिफोर्निया व टेक्सास या राज्यांमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांमध्येही काही भारतीय वंशाच्या व्यक्ती असण्याची शक्यता आहे. पण त्यांचे राष्ट्रीयत्व अद्याप नक्की कळालेले नाही.४कडक निर्बंधांमुळे यापैकी अनेक मृतांवर स्थानिक प्रशासनानेच अंत्यसंस्कार केले व मृतांच्या कुटुंबीयांनाही त्या वेळी हजर राहू दिले गेले नाही, असेही सांगितले जाते.४बाधित झालेल्या भारतीय वंशाच्या १६ व्यक्ती मूळच्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व कर्नाटक या भारतातील राज्यांतील आहेत. अमेरिकेतील भारतीय वकिलात व विविध शहरांमधील वाणिज्य दूतावास भारतीय अमेरिकी संघटनांच्या सहकार्याने कोरोनावाधित भारतीय वंशाचे नागरिक व विद्यार्थी यांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या