शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शार्कपेक्षा माणूस ३०० पट जास्त धोकादायक; अन्न, औषध आणि व्यवसायासाठी मुक्या प्राण्यांचे शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:32 IST

नवे संशोधन; अन्न, औषध आणि व्यवसायासाठी मुक्या प्राण्यांचे शोषण

लंडन : प्राण्यांपेक्षा माणूस जास्त धोकादायक आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. मानव खरोखरच धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांनी संशोधनातून प्रथमच सिद्ध केले आहे. ब्रिटनमधील वॉलिंगफोर्ड ऑक्सफर्डशायरच्या सेंटर फॉर इकॉलॉजी अँड हायड्रोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, शार्कसारख्या शिकारी प्राण्यांपेक्षा मानव ३०० पट जास्त धोकादायक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मानव कधी-कधी एक तृतीयांश प्राण्यांचे अन्न म्हणून, कधी औषध म्हणून, तर कधी पाळीव प्राणी म्हणून शोषण करतो; यामुळे जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याचा धोका वाढला आहे.

निसर्ग आणि पर्यावरणाला मोठा धोका...मानवाची ही प्रवृत्ती त्यांना पांढऱ्या शार्कसारख्या भक्षकांपेक्षा शेकडो पटींनी जास्त धोकादायक बनवते. मानवाची ही प्रवृत्ती निसर्गासाठी तसेच पर्यावरणासाठी एक गंभीर इशारा आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधनाशी संबंधित डॉ. रॉब कुक म्हणाले की, संशोधनात जे आढळले ते अतिशय आश्चर्यकारक आहे. प्राण्यांना वापरण्यासाठी मानवाकडे अनेक युक्त्या आहेत. जगभर मानव-निसर्ग संबंध अधिक दृढ करण्याची गरज आहे.

प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावरसंशोधकांना असे आढळले की, प्राण्यांच्या १४,६६३ प्रजातींचा वापर किंवा व्यापार केला जातो. यातील ३९ टक्के प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनादरम्यान, ५०,००० विविध वन्य, सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि मासे यांचा अभ्यास करण्यात आला.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय