शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Facebook : फेसबुकच्या ट्रेड टूलद्वारे जगभर होतेय मानवी तस्करी; माजी कर्मचारी फ्रान्सिस होगेन यांच्या आरोपामुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 05:33 IST

Facebook : होगेननी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या.

वॉशिंग्टन : फेसबुकच्या ट्रेड टूलमार्फत जगभरात मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होते, असा आरोप कंपनीची माजी कर्मचारी फ्रान्सिस होगेन यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ट्रेड टुलमध्ये महिलांचे वय, फोटो अशी माहिती दिली जाते. त्यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ माजली आहे.

होगेननी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या. त्यांनी सांगितले की, जर फेसबुकवर कोणीही अरबी भाषेत खादीमा किंवा मेड्स असा शब्द लिहून शोध घेतला तर आफ्रिकी तसेच दक्षिण आशियाई महिलांची छायाचित्रे आदी तपशील किमतीसकट दिसून येईल. ती छायाचित्रे पाहून या महिलांची कोणीही निवड करू शकतो व दिलेल्या किमतीइतके पैसे मोजून आपल्याकडे बोलावून घेऊ शकतात. ही उघडपणे चाललेली मानवी तस्करी आहे.

होगेन यांनी उघड केलेल्या कागदपत्रांमधून भारताबद्दलच्या काही गोष्टी उजेडात आल्या. भारतामध्ये २०१९ साली लोकसभा निवडणुकांवर फेसबुकने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही या कंपनीच्या अंतर्गत अहवालाच्या नोंदींच्या आधारे करण्यात आला होता. या प्रकरणी फेसबुकची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली होती. (वृत्तसंस्था)

आखाती देशांत कामगारांचे शोषणफेसबुकने म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये विदेशी कामगारांचे शोषण होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. फेसबुकचा वापर करून मानवी तस्करी करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. हे प्रकार कसे रोखता येतील, यावर आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत.

तक्रारीनंतरही कारवाई नाहीदोन वर्षांपूर्वी आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक व इन्स्टाग्राम हटविण्याचा इशारा ॲपलने दिला होता, त्यामागे मानवी तस्करी हेच महत्त्वाचे कारण होते. फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये मानवी तस्करी होत आहे. विदेशी महिलांची कामांच्या नावाखाली त्यांची पिळवणूक होते, असा आरोप ॲपलने केला होता.महिलांची पिळवणूक करणाऱ्यांना दोन ॲपमधून हटविले जाईल, असे आश्वासन फेसबुक दिले. पण ते पाळले नाही.

टॅग्स :Facebookफेसबुक