शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यातील केमिस्ट्री इतकी कमाल होती की, त्याची चर्चा फक्त भारतातच नाही, तर जगभरात सुरू आहे.

चीनच्या तियानजिन शहरात सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत एक अविश्वसनीय दृश्य पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यातील केमिस्ट्री इतकी कमाल होती की, त्याची चर्चा फक्त भारतातच नाही, तर जगभरात सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी केवळ चार तासांत तब्बल आठ वेळा एकमेकांची भेट घेतली आणि विशेष म्हणजे, एकाच कारमधून प्रवास करून जगातील महाशक्तींना एक मोठा संदेश दिला.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पुतिन यांची भेट घेण्यासाठी आठ महिने तळमळत होते, त्याच पुतिन यांना मोदी एका दिवसात वारंवार भेटतात, यावरून दोन्ही देशांचे संबंध किती घट्ट आहेत हे दिसून येते. चीनमध्ये झालेली ही भेट अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी एक मोठा धक्का मानली जात आहे.

एकाच गाडीतून प्रवासपंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतिन यांची भेट अतिशय उत्साहात झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर द्विपक्षीय बैठकीसाठी एकाच गाडीतून प्रवास केला. या क्षणाचा फोटो जगभरात व्हायरल झाला. मोदींनी हा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले, “एससीओ परिषदेनंतर मी आणि राष्ट्रपती पुतिन आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकत्र गेलो. त्यांच्याशी बोलणे नेहमीच ज्ञानवर्धक असते.”

ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातांवर ५० टक्के टॅरिफ लावले आहेत, ज्यातील अर्धे शुल्क रशियासोबत व्यापार केल्याबद्दल भारतावर दंड म्हणून लादण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेला न जुमानता मोदी आणि पुतिन यांनी एकमेकांना दिलेली साथ जगाला एक वेगळाच संदेश देऊन गेली आहे.

चीन-भारत संबंधातही सुधारणेची शक्यतामोदी आणि पुतिन यांच्या भेटीत केवळ भारत-रशिया संबंधांवरच नाही, तर भारत आणि चीनच्या संबंधांवरही चर्चा झाली. विशेष म्हणजे, राष्ट्रपती पुतिन यांनी चीनला भारतासोबत संबंध सुधारण्याचा सातत्याने आग्रह धरला आहे. बैठकीच्या आधी मोदी, पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तिन्ही नेते एकत्र भेटले. त्यांच्यात सुमारे दोन मिनिटे संवाद झाला आणि तिघेही खूप आनंदी दिसत होते. यामुळे भविष्यात भारत आणि चीनच्या संबंधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना लिहिले, "राष्ट्रपती पुतिन यांना भेटून नेहमीच आनंद होतो." या भेटीगाठी आणि सार्वजनिक ठिकाणी दिसलेली त्यांची मैत्री, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. यामुळे, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका एकाकी पडत असताना, भारत आपल्या जुन्या मित्रासोबतची मैत्री आणखी घट्ट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन