शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Howdy Modi: इस्लामिक कट्टरतावादाचा एकत्र सामना करू; ट्रम्प यांचा पाकिस्तानवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 00:33 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक

ह्युस्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत एक मजबूत देश म्हणून वाटचाल करत असल्याचे कौतुकोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले. मोदींमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले असल्याचं ते म्हणाले. उज्ज्वल भविष्य हे दोन्ही देशांचं स्वप्न आहे. दोन्ही देश इस्लामिक कट्टरतावादाचा मिळून सामना करतील, असंदेखील ट्रम्प म्हणाले. यानंतर ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 50 हजार अनिवासी भारतीयांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इस्लामिक कट्टरतावादावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. कट्टरतावादी इस्लामिक दहशतवादापासून निर्दोष लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दोन्ही देश एकत्रितपणे दहशतवादाशी दोन हात करतील, अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात सीमा सुरक्षेचाही उल्लेख केला. दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा सुरक्षित करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी दोन्ही देश एकत्रित पावलं उचलतील, असं ट्रम्प म्हणाले. पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे. 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस झाला. त्याबद्दल ट्रम्प यांनी मोदींना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कार्यकाळात 30 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले. त्यांनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे, अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. भारत आणि अमेरिकेच्या संविधानातही बरंच साम्य असल्याचं ते म्हणाले. मोदी व्हाईट हाऊसचे अतिशय विश्वासू मित्र आहेत. मोदींना ट्रम्पपेक्षा चांगला मित्र मिळणार नाही, असंदेखील ट्रम्प यांनी पुढे म्हटलं.  

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान