शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 22:58 IST

America Entry in Israel Iran War: अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्यामुळे आता काय होणार, इराण कसा प्रतिकार करणार, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

America Entry in Israel Iran War:इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात अखेर अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हल्ले केले. यानंतर आता जगभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर शांतता निर्माण होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चाही केली. यातच या युद्धात रशिया उडी घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणकडे कोणते पर्याय आहेत? इराणचे पुढचे पाऊल नेमके काय असेल? याबाबत काही तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन हल्ल्यानंतर इराणमध्ये प्रचंड संतप्त वातावरण आहे. अमेरिकाविरोधात आक्रोश आहे. सर्वांच्या मनात बदला घ्यायची भावना तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत, इराणकडे पहिला पर्याय म्हणजे अमेरिकन तळांवर लक्ष्य करणे, असा असू शकतो. इराण अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांनाही लक्ष्य करू शकतो. गेल्या काही वर्षांपासून इराणचे नौदल या संपूर्ण कारवाईचा सराव करत आहे. अमेरिकेवर हल्ला करण्याव्यतिरिक्त इराण राजनैतिक मार्ग निवडू शकतो. हार्मोझ सामुद्रधुनीचा तेल मार्ग बंद करू शकतो. इराणच्या संसदेने या निर्णयाला आधीच हिरवा कंदील दाखवला असून, आता राष्ट्रीय परिषदेला अंतिम मान्यता द्यावी लागेल, असे म्हटले जात आहे. 

दुसरा पर्याय म्हणजे इराणची एक रणनीती अशीही असू शकते की, सध्या कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही. योग्य वेळेची वाट पाहायची. योग्य वेळ आल्यावर, इराण अमेरिकेच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतो. इराण अचानक हल्ला करू शकतो. परंतु असे सरप्राइज हल्ले होईपर्यंत इराणमधील सामान्य नागरिक युद्धाच्या वातावरणातून, मानसिकतेतून बाहेर पडलेले असू शकता आणि कारवाईमुळे त्यांना पुन्हा कठीण टप्प्यातून जावे लागेल, असे आव्हान इराणसमोर उभे राहू शकते.

तिसरा पर्याय म्हणजे इराण अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे हल्ला न करता वाटाघाटी करू शकतो. असे करणे इराणसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकेल. हा त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. जर त्याला अमेरिकन हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करायचे असेल, इराणवासीयांची सुरक्षितता लक्षात घेता, इराण असा निर्णय घेऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आपण मॉस्को येथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भेटणार असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, अनेक देश इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत, असा दावा रशियाचे माजी राष्ट्रपती तथा रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका