शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पेहचान कौन? किती चेहरे आपल्या लक्षात राहातात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:49 PM

दिवसभरामध्ये आपल्याला स्मार्टफोनवर, टीव्हीवर दिसणारे आणि प्रत्यक्ष समोर असणारे चेहरे लक्षात कसे राहातात याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. या अभ्यासावर आधारित शोधनिबंध रॉयल सोसायटी बी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

न्यू यॉर्क- घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, प्रवासात दररोज भरपूर लोक आपल्या समोरुन जात असतात. तसेच टीव्ही वाहिन्या, बातम्यांच्या वाहन्या यातूनही अनेक चेहऱ्यांना आपण पाहात असतो. मात्र प्रत्येक व्यक्ती ५००० चेहरे ओळखू शकतो असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. युनिव्हर्सिटी आॅफ यॉर्कने प्रसिद्ध आपल्या चेहरा ओळखण्याच्या क्षमतेबाबत अभ्यास केला आहे.  दिवसभरामध्ये आपल्याला स्मार्टफोनवर, टीव्हीवर दिसणारे आणि प्रत्यक्ष समोर असणारे चेहरे लक्षात कसे राहातात याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. या अभ्यासावर आधारित शोधनिबंध रॉयल सोसायटी बी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना आपण किती जणांचे चेहरे ओळखू शकता असे प्रश्न विचारण्यात आले होते. यॉर्कच्या मानसशास्त्र विभागातील अध्यापक रॉब जेन्किन्स यांनी या अभ्यासाबद्दल आपले मत सांगितले आहे. आपल्याला आयुष्यामध्ये मित्र, सहकारी, प्रसिद्ध व्यक्ती आणि अनेकांना चेहऱ्यावरुन ओळखण्याची सवय झालेली असते. पण आपल्याला नक्की किती चेहरे ओळखता येतात याचा कोणीच अभ्यास केला नव्हता. या निरीक्षणामध्ये सहभागी लोकांना १००० ते १०,००० चेहरे ओळखता येत असल्याचे लक्षात आले. लोकांना सरासरी ५००० चेहरे ओळखता येतात असं आम्हाला अभ्यासात दिसलं असे रॉब जेन्किन्स यांनी सांगितले.     लोकांची ही चेहऱ्याची भाषा आपण ओळखू शकलो तर फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअरची निर्मिती करता येईल आणि त्याचा वापर विमानतळांवर तसेच गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी करता येईल असं त्यांचं मत आहे. अशा सॉफ्टवेअरचा उपयोग अनोळखी चेहऱ्यांची ओळख पटवण्यासाठीही केला जाऊ शकतो.  या अभ्यासकांच्या मते काही लोकांमध्ये आणखी चेहरे ओळखता येण्याची आणि अमर्याद चेहरे लक्षात ठेवण्याची क्षमता असू शकते.   पुरेशा सरावामुळे ते अमर्याद चेहरे लक्षात ठेवू शकतात. शब्द आणि भाषा लक्षात ठेवण्याची मेंदूमध्ये अमर्याद शक्ती असते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हजारो चेहऱ्यांमध्ये फरक ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये का तयार झाली असावी हे आजूनही स्पष्ट झाले नसल्याचे जेन्किन्स यांनी सांगितले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय