शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन कार्डधारकाला किती दिवस अमेरिकेबाहेर वास्तव्य करता येतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 12:22 IST

ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेबाहेर वास्तव्य करण्याचे काही नियम आहेत. ते न पाळल्यास रहिवासी म्हणून दिलेला दर्जा धोक्यात येऊ शकतो.

प्रश्न- माझी आई ग्रीन कार्डधारक असून ती माझ्यासोबत भारतात राहते. ती गेल्या नऊ महिन्यांपासून अमेरिकेच्या बाहेर आहे. ती किती दिवस अमेरिकेच्या बाहेर राहू शकते?उत्तर- सध्याच्या नियमांनुसार, अमेरिकेच्या कायदेशीर कायम रहिवाशाला (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकाला ३६४ दिवसांत अमेरिकेत परतावं लागतं. एखाद्या व्यक्तीनं परदेशात जाण्यापूर्वी पुनर्प्रेवेशाचा परवाना घेतला असल्यास वरील नियम लागू होत नाही. संबंधित व्यक्तीला पुनर्प्रेवेशाचा परवाना यूएससीआयएसकडून (फॉर्म-१३१) मिळतो. पुनर्प्रेवेशाचा परवाना घेतला असल्यास संबंधित व्यक्तीला पुनर्प्रेवेशाचा परवान्याची वैधता संपण्यापूर्वी अमेरिकेत परतावं लागतं. तुमची आई अमेरिकेबाहेर केव्हा पडली ती तारीख आणि तिच्याकडे पुनर्प्रेवेश परवाना आहे का, ते तपासून पाहा. तुमची आई भारतात किती दिवस राहू शकते, याची माहिती यामधून तुम्हाला मिळेल.सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी काळ अमेरिकेबाहेर असलेल्या ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेत परतण्याची परवानगी आहे. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे प्रवासाची कागदपत्रं (पासपोर्ट किंवा अमेरिकेतील वाहन चालक परवाना) हवीत. जर ते पुनर्प्रेवेश परवान्याच्या सहाय्यानं परतणार असतील, तर त्यांचा पुनर्प्रेवेश परवाना वैध असायला हवा.अमेरिकेच्या बाहेर जाण्याआधी पुनर्प्रेवेश परवाने मिळवणं गरजेचं असतं. अमेरिकेत असतानाच पुनर्प्रेवेश परवान्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. कोणत्याही वैध पुनर्प्रेवेश परवान्याशिवाय एक वर्षापेक्षा जास्त काळ अमेरिकेबाहेर वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर रहिवासी म्हणून देण्यात आलेली मान्यता धोक्यात येऊ शकते.याबद्दच्या अधिक माहितीसाठी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या संकेतस्थळाला भेट द्या.

टॅग्स :Americaअमेरिका