शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन नागरिकांना भारतात असताना दुतावासाकडून अलर्ट कसे मिळू शकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:48 IST

अमेरिकन नागरिकांना स्टेपच्या माध्यमातून महत्त्वाचे अलर्ट दिले जातात.

प्रश्न- मी अमेरिकेचा नागरिक असून भारतात असलेल्या माझ्या कुटुंबाच्या भेटीसाठी जाणार आहे. मला अमेरिकेच्या दुतावासाकडून बातम्या आणि अलर्ट कसे मिळू शकतील?उत्तर- स्मार्ट ट्रॅव्हलर एन्रोलमेंट प्रोग्राममध्ये (स्टेप) नावनोंदणी करून अमेरिकन नागरिक ते प्रवास करत असलेल्या देशांमधील अमेरिकेच्या दुतावासाकडून तिथल्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. स्टेप ही मोफत ऑनलाईन नोटिफिकेशन यंत्रणा असून त्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना परदेशात असताना सुरक्षेच्या संदर्भातील आवश्यक माहिती मिळते. यासाठी अमेरिकन नागरिकांना स्टेपवर त्यांचा संपर्क क्रमांक द्यावा लागतो.अमेरिकन दुतावास स्टेपच्या माध्यमातून कोविड-१९ महामारीशी संबंधित माहिती अमेरिकेच्या नागरिकांना देत आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा कौटुंबिक आणीबाणीच्या परिस्थितीतही अमेरिकन दुतावास स्टेपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पुरवतो. अमेरिकन नागरिक प्रवास करत असलेल्या देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याबद्दलची सर्व आवश्यक आणि महत्त्वाची माहिती अमेरिकन दुतावास पुरवतो. स्टेप प्रोग्रामसाठी नोंदणी केलेल्या अमेरिकन नागरिकांना ही माहिती पुरवली जाते. step.state.gov या संकेतस्थळावर संपर्काबद्दलची माहिती देऊन अमेरिकेचे नागरिक स्टेपसाठी त्यांच्या नावाची नोंद करू शकतात. त्यानंतर तुम्ही दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर मेसेज पाठवले जातात. तुम्ही करत असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती प्रोफाईलवर देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही भविष्यात फ्रान्सला जाणार असाल, तर तुम्ही प्रवासाच्या तारखांचा तपशील स्टेपवर ऑनलाईन नोंदवू शकता. या कालावधीत फ्रान्समध्ये कोणतीही आणीबाणी निर्माण झाल्यास अमेरिकन दुतावास तुम्हाला अलर्ट पाठवतो. या प्रोफाईलमध्ये तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या नावांचीदेखील नोंद करू शकता.तुम्ही स्टेप प्रोग्राममध्ये नावाची नोंदणी केली असल्यास अमेरिकन दुतावासाला आणीबाणीच्या परिस्थितीत तुमच्यासोबत थेट संपर्क साधता येतो. अमेरिकन नागरिकांनी स्टेप प्रोग्राममध्ये त्यांच्या नावाची नोंद करावी आणि कोणत्याही देशात जाण्याआधी स्टेप प्रोफाईलमध्ये त्याची माहिती द्यावी. त्यामुळे त्यांना सुरक्षित राहण्यास मदत होते.

टॅग्स :Americaअमेरिका