शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मॉस्कोतील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ISIS कडून भीषण हल्ला; 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 08:22 IST

ISIS Attack on Moscow update: गेल्या काही वर्षांपासून आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. परंतु, मॉस्कोच्या हल्ल्याने पुन्हा या क्रूर दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

दहशतवादी संघटना आयएसआयएसने शुक्रवारी रात्री मॉस्कोतील क्रॉकस कॉन्सर्ट हॉलमध्ये भयावह गोळीबार व बॉम्बस्फोट घडवून आणला. या भीषण दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून १४५ जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला रशिया-युक्रेन युद्धातून हल्ला झाल्याचे वाटत असताना आयएसआयएसने टेलिग्राम चॅनलवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत जगाला हादरवरून सोडले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. परंतु, मॉस्कोच्या हल्ल्याने पुन्हा या क्रूर दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्राम चॅनलवर जारी केलेल्या वक्तव्यामध्ये हल्लेखोर सुरक्षितरित्या त्यांच्या घरी परतले आहेत, असे म्हटले आहे. 

दरम्यान रशियन मीडियाने दहशतवाद्यांचे फोटो प्रकाशित केले आहेत. हल्लेखोर आशियाई आणि कॉकेशियाई लोकांसारखे दिसत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच रशियन नाही तर परदेशी भाषेमध्ये बोलत होते. रशियन प्रसारमाध्यमांनुसार हे दहशतवादी इन्गुशेतियाचे मुळ रहिवासी आहेत. सैन्यासारख्या वेशात ते आतमध्ये आले होते व गोळीबार सुरु केला. बॉम्बफेकल्याने हॉलमध्ये आग लागली. दिसेल त्याला त्यांनी गोळ्या झाडल्या. कॉन्सर्ट हॉलमध्ये या हल्ल्यावेळी ६२०० लोक उपस्थित होते. एका म्युझिक शोसाठी ते आले होते. रशियाने आंतरराष्ट्रीय संघटनेला या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. 

दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी मॉस्कोवरील हल्ल्यात आमचा हात नसल्याचे म्हटले आहे. आमचे चारही बाजुंनी रशियन सैन्यासोबत युद्ध सुरु आहे. आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा केल्याशिवाय मैदानात लढत राहू, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादी