शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

लँडिंगच्या परवानगीअभावी घिरट्या घालणारे विमान कोसळले, ४९ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:52 IST

उतरण्याची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाच्या आकाशातच घिरट्या घालत असलेले प्रवासी विमान काठमांडू विमानतळाजवळ कोसळले.

काठमांडू : उतरण्याची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाच्या आकाशातच घिरट्या घालत असलेले प्रवासी विमान काठमांडू विमानतळाजवळ कोसळले. या भीषण अपघातता ४९ जण ठार तर अनेक जखमी झाले. विमानात कर्मचाºयांसह एकूण ७१ जण होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.युएस-बांग्ला या खासगी कंपनीचे हे विमान बांगलादेशमधील ढाका येथून नेपाळमधील काठमांडूला चालले होते. काठमांडू विमानतळाजवळ असलेल्या फूटबॉल मैदानावरच हे विमान कोसळले. घटनास्थळावर विमानाचे अक्षरश: तुकडे तुकडे इतस्तत: विखुरले होते.दुर्घटनाग्रस्त विमानाला आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. जळालेले मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलात हलविण्यात आले.यापूर्वी सप्टेंबर २०१२ मध्येच माऊंट एव्हरेस्टला ट्रेकर्सना घेऊन चाललेले विमान काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेताच कोसळले होते. या अपघातात १९ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था) धावपट्टीहून काही अंतरावर विमान कोसळलेल्या गवताळ भागात असंख्य कर्मचारी बचावकार्य करीत होते. डझनाहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी लागलेली आग नियंत्रणात आणली. पडलेले विमान पाहण्यासाठी जवळच्या टेकडीवर स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. विमानतळावर उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने या विमानाने काठमांडू विमानतळाभोवती दोन घिरट्या घातल्या होत्या. - मोहम्मद सेलीम, व्यवस्थापक, काठमांडू एअरलाईन्स>एका अमेरिकन महिलेने प्रत्यक्ष पाहिला थरारकाठमांडू विमानतळावर उतरण्याच्या काही क्षण आधीच या विमानाने आपला मार्ग बदलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मूळच्या अमेरिकन असलेल्या अमेन्डा समर्स कामानिमित्त नेपाळमध्ये राहतात. त्यांनी हा अपघात घराच्या गच्चीतून पाहिला. समर्स यांनी सांगितले की, विमान जमिनीपासून इतक्या जवळून उडत होते की मला वाटले ते आता टेकडीला धडकणारच. त्याचवेळी अचानक एक स्फोट झाला, त्यानंतर अनेक स्फोट झाले. नंतर अगदी काही क्षणातच आगीच्या ज्वाळा निघू लागल्या व काही वेळात शहरावर एकदम दाट धुराचे ढग दिसू लागले.