शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँग: गगनचुंबी इमारतींच्या आगीने घेतले १२८ बळी, अखेर तीन दिवसांनी बचावकार्य स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:33 IST

Hong Kong Skyscrappers Fire: इमारतींना आग कशी लागली याचा तपास हाँगकाँग पोलिसांनी सुरू केला आहे

Hong Kong Skyscrappers Fire: हाँगकाँगमधील एकाशेजारी एक असलेल्या सात गगनचुंबी इमारतींना भीषण आग लागली होती. अखेर तिसऱ्या दिवशी अग्निशमन दलाने आणि बचाव पथकाने शोध मोहीम स्थगित केली. यातील मृतांचा आकडा १२८ वर पोहोचला आहे आणि २०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. येथील १,९८४ अपार्टमेंटमध्ये सुमारे ४,६०० लोक राहत होते. इमारतींना आग कशी लागली याचा तपास हाँगकाँग पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच, बांधकामात सहभागी असलेल्या आठ जणांनाही अटक केली आहे.

हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्र (HKSAR) सरकारने पत्रकार परिषदेत सांगितले की स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता अग्निशमन, बचाव आणि शोध मोहिम स्थगित करण्यात आली. HKSAR सरकारचे सुरक्षा सचिव ख्रिस तांग पिंग-केउंग यांनी सांगितले की, ताई पो येथे लागलेल्या आगीत आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, पोलिस घटनास्थळी तपास करण्यासाठी पोहोचतील तेव्हा आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांचे कुटुंबीय त्यांच्या अपडेट्सची वाट पाहत आहेत.

३९१ अग्निशमन गाड्या, १८५ रुग्णवाहिका अन्...

दरम्यान, हाँगकाँगच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात सहभागी असलेल्या एका महिलेसह आठ जणांना अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की तीन दिवसांच्या या कारवाईत एकूण ३९१ अग्निशमन गाड्या, १८५ रुग्णवाहिका आणि २,३११ अग्निशमन आणि रुग्णवाहिका कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अग्निशमन दलातील एकाचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले. हाँगकाँग पोलिस दल संपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी तपास करत आहे. याला तीन ते चार आठवडे लागण्याची अपेक्षा आहे.

सरकारने दिली मदत

हाँगकाँग सरकारने प्रत्येक पीडित कुटुंबाला २००,००० हाँगकाँग डॉलर्स (सुमारे २५,६९३ अमेरिकन डॉलर्स)चे अनुदान जाहीर केले. पुढील आठवड्यापासून प्रत्येक कुटुंबाला ५०,००० हाँगकाँग डॉलर्सचा राहणीमान भत्ता मिळेल, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हाँगकाँग सरकारने गुरुवारी संध्याकाळपासून प्रत्येक बाधित कुटुंबाला त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी १०,००० हाँगकाँग डॉलर्सचे आपत्कालीन रोख अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

अलार्म वाजलाच नाही

आगीचे कारण अद्याप कळलेले नाही, परंतु खिडक्यांवर असलेल्या स्टायरोफोममुळे आगीचा प्रसार जलद गतीने झाला असावा असा संशय आहे, असे बीबीसीने वृत्त दिले आहे. आगीतून बचावलेल्यांनी तक्रार केली की अग्निशामक अलार्म काम करत नव्हते, ज्यामुळे रहिवाशांना कोणतीही आगाऊ सूचना मिळू शकली नाही. आग प्रथम वांग चेओंग हाऊसच्या खालच्या मजल्यावरील जाळ्यात लागली आणि फोम बोर्ड पेटले, त्यानंतर आग इतर इमारतींमध्ये वेगाने पसरली. वाचलेल्यांना जवळच्या १,००० रिकाम्या अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hong Kong Skyscraper Fire Claims 128 Lives; Rescue Suspended

Web Summary : A massive fire engulfed seven Hong Kong skyscrapers, claiming 128 lives. Rescue efforts were suspended after three days. Over 200 are missing. Authorities are investigating the cause and have arrested eight individuals involved in building renovations. The government is providing financial aid to affected families.
टॅग्स :fireआगPoliceपोलिस