शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास बसणार नाही, पण एका हनीमुनमुळे नागासाकीवर अणुबॉम्ब पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 11:20 IST

विमानात 12 सायनाईड या अतिजहाल विषाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबई : दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याच्या आठवणींनी आजही जपानच्या लोकांच्या अंगावर शहारे येतात. खरे म्हणजे अमेरिकेच्या यादीमध्ये नागासाकी हे शहरच नव्हते. विश्वास बसणार नाही, पण एका मंत्र्याच्या हनिमुनच्या आठवणींमुळे ऐनवेळी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.   अमेरिकेच्या हवाईदलाने 6 ऑगस्ट, 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला. यानंतर तीन दिवसांनी नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकून जपानला नेस्तनाभूत करण्यात आले होते. या घटनेबाबत अनेक खुलासे आता समोर येत आहेत.   अमेरिकेमध्ये अणुबॉम्ब बनविण्यात आला होता. मात्र, तो जपान पर्यंत नेणे धोकादायक होते. दुसऱ्या युद्धामध्ये नाझी फौजा, जपानचे सैन्य वरचढ ठरत होते. त्यातच अमेरिकेमध्ये हा अणुबॉम्ब जोडल्यास तो अमेरिकेतच फुटण्याचा धोका होता. या मुळे शत्रुच्या प्रदेशात गेल्यानंतर मोठ्या विमानातच तो जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमानाचे नाव होते एनोला गे. याचबरोबर विमानात 12 सायनाईड या अतिजहाल विषाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. अमेरिकेचे हे ऑपरेशन फसले असते किंवा हवाई दलाचे सैनिक पकडले गेले असते तर त्यांना या गोळ्या खाऊन मरण पत्करण्याचे आदेश होते.  जपानच्या कोणत्या शहरांवर अणुबॉम्ब टाकायचे, याची यादीही बनविण्यात आली होती. यात नागासाकीचे नावही नव्हते. या यादीमध्ये कोकुरा, हिरोशिमा, योकोहामा, निगाटा आणि क्‍योटो ही शहरे होती. 25 जुलै रोजीच क्‍योटो या शहराऐवजी नागासाकीचे नाव बदलण्यात आले. याचा किस्साही तसाच गमतीशीर आहे. अमेरिकेचे तत्कालीन युद्ध मंत्री हेन्री एल स्टिमसन यांनी ऐनवेळी नागासाकीचे नाव यादीमध्ये बदलले. कारण असे होते की, स्टिमसन यांनी क्योटो शहरामध्ये आपले हनीमून केले होते. यामुळे या शहराशी ते भावनिकदृष्या जोडले गेले होते. या शहराशी जोडलेल्या आठवणींमुळे त्यांनी क्योटो ऐवजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला होता. एका हनीमूनमुळे क्योटो शहराचा विध्वंस वाचला होता.

टॅग्स :Hiroshima Nagasaki Bombingहिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्बAmericaअमेरिकाJapanजपानwarयुद्ध