शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! Netflix वरील मालिका पाहून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 09:09 IST

ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज यासारख्या गेमच्या आहारी जाऊन लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देनेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.जेसिका स्कॅटरसन असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून अमेरिकेत ही घटना घडली.'13 reasons why' ही  नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून मुलीने गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

वॉशिंग्टन - ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज यासारख्या गेमच्या आहारी जाऊन लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेसिका स्कॅटरसन असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून अमेरिकेत ही घटना घडली. '13 reasons why' ही  नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून मुलीने गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

जेसिकाने घरातील बाथरूममध्ये गळफास घेतला. तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना ही चिठ्ठी सापडली. यामध्ये तिने आत्महत्येची सहा कारणं लिहिली होती. जेसिकाच्या आईने नेटफ्लिक्सवरील '13 reasons why' मालिका जेसिका पाहत असून त्यानंतर तिच्या वागणुकीत अचानक बदल झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच मालिका पाहून आत्महत्या केल्याचा संशय तिच्या आईनेही व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसिका तिच्या शाळेतील मित्रांमुळे तणावात होती आणि ही मालिका पाहून तिच्याकडे आत्महत्येचा एकच पर्याय दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेसिकाच्या खोलीमध्ये आत्महत्या करणाऱ्या एका मुलीचा फोटोही आढळला आहे. तसेच तिच्या हातावर ब्लेडने केलेले काही वारही आढळले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. '13 Reasons Why' ही एक अमेरिकेतील मालिका आहे. ज्यामध्ये तरुण-तरुणींमधील नैराश्य आणि त्यांच्या आत्महत्या यासंदर्भातील गोष्टींचा समावेश आहे. मालिकेमुळे याआधीही अनेकदा वाद निर्माण झाला आहे. तसेच मालिकेविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. 

नेटफ्लिक्सवरील या मालिकेमध्ये एका मुलीवर झालेल्या बलात्काराची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यावेळी दाखवण्यात आलेल्या अनेक दृष्यांवर लोकांनी आक्षेप घेतला होता. तसेच ही मालिका बंद करण्याची देखील मागणी देखील केली होती. मात्र त्यानंतर आता 12 वर्षीय जेसिकाने ही मालिका पाहून आत्महत्या केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. '13 reasons why' ही मालिका पाहून आतापर्यंत 6 जणांनी आत्महत्या केली आहे.

 

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सSuicideआत्महत्याDeathमृत्यू