शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेचा दणका, दहशतवादी संघटना घोषित करत घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 22:03 IST

काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दणका दिला आहे. अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश केला आहे. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे.

वॉशिंग्टन, दि, 16 - काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दणका दिला आहे. अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश केला आहे. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेने केलेली ही करवाई म्हणजे दहशतवादाच्या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडण्याच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश म्हणून पाहिले जात आहे. तसेच दहशतवादी संघटनांच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नानांही या कारवाईमुळे धक्का बसला आहे.  या कारवाईबाबत अमेरिकेचा राजकोषीय विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, " अमेरिकेने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना असलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनला परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिकेमधीला या दहशतवादी संघटनेची कुठलीही संपत्ती अमेरिका जप्त करेल. तसेच या दहशतवादी संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येऊ नयेत, असे निर्देश अमेरिकी नागरिकांना देण्यात येतील.याआधी जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्यापूर्वी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याचे त्याने म्हटले होते. 

सय्यद सलाउद्दीन दहशतवादी नाही, पाकच्या उच्चायुक्तांनी केली पाठराखणदरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा पुळका आला होता. ''पाकिस्तान सलाउद्दीनला दहशतवाद्याच्या स्वरुपात पाहत नाही. सलाउद्दीन काश्मिरींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. जेथे पाकिस्तानचा मुद्दा आहे तर आम्ही सलाउद्दीनला एखाद्या दहशतवादी म्हणून पाहत नाही'', असे सांगत बासित यांनी सलाउद्दीनची पाठराखण केली होती.   ज्यावेळी सलाउद्दीनची आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषणा करण्यात आली होती त्यावेळी देखील पाकिस्ताननं सलाउद्दीनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ''काश्मीरमधील नागरिकांच्या हक्काविषयी बोलणाऱ्याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य आहे'', असे सांगत पाकिस्तानने सलाउद्दीनचा बचाव केला होता.