शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

India-US Trade Deal: भारतासाठी गूड न्यूज! अमेरिकेने आयात शुल्क घटवले, मोदींशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 06:12 IST

India-US Trade Deal: आता टॅरिफ २५ वरून १८ टक्के, ५०० अब्ज डॉलरच्या अमेरिकन वस्तू खरेदी करणार भारत; भारतासाेबतच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या व्यापार कराराचीही ट्रम्प यांनी केली घोषणा

न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत अनेक महिन्यांपासून रखडलेला व्यापार करार झाला असल्याची घोषणा केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या करारानुसार, भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे. या निर्णयाची माहिती ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.

भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. ते माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक असून, आपल्या देशाचे प्रभावी व आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापारासह अनेक विषयांवर चर्चा केली, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबाबतही बोललो. मोदींनी रशियन तेलाची खरेदी थांबवून त्याऐवजी अमेरिकेकडून, तसेच व्हेनेझुएलाकडून खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे युद्ध थांबेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

तात्काळ प्रभावाने लागू होणार नवीन व्यापार करार

- पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेल्या मैत्री आणि परस्पर आदरातून, तसेच त्यांच्या विनंतीनुसार, तत्काळ प्रभावाने अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. 

- या करारानुसार अमेरिका रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के इतके कमी करेल. त्याचप्रमाणे भारतही अमेरिकेविरुद्धचे आपले शुल्क आणि इतर अडथळे टप्प्याटप्प्याने शून्यापर्यंत कमी करण्याच्या दिशेने पुढे जाईल, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेच्या कोणत्या वस्तू खरेदी करणार भारत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर अनेक उत्पादनांची ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खरेदी करण्याचे, तसेच अत्यंत उच्च स्तरावर 'अमेरिकन वस्तू खरेदी' करण्याचेही आश्वासन दिले आहे. भारतासोबतचे आमचे संबंध भविष्यात आणखी दृढ होतील, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

"पंतप्रधान मोदी आणि मी असे नेते आहोत की जे काम पूर्ण करून दाखवतो, जे बहुतेकांच्या बाबतीत म्हणता येत नाही. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!", असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

"‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील शुल्क आता १८ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याची बातमी अत्यंत आनंददायी आहे. या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी भारतातील १.४ अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार. जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा थेट फायदा आपल्या लोकांना होतो आणि अनेक संधी निर्माण होतात. शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्ण पाठिंबा देतो", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Good news for India: US reduces import duties after Modi-Trump talks

Web Summary : US lowers import duties on Indian goods to 18% after talks between Trump and Modi. India will also reduce tariffs. India pledged to buy $500B of US goods.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAmericaअमेरिका