शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरु नानक महालाची मोडतोड, मौल्यवान सामान चोरले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 16:12 IST

पाकिस्तानमध्ये अजून एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड झाली आहे.

लाहोर - पाकिस्तानमध्ये अजून एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड झाली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेल्या अनेक शतके जुन्या गुरू नानक महालाचा एक मोठा भाग स्थानिक व्यक्तींनी अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने तोडला. तसेच या महालाती मौल्यवान सामान विकून टाकल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार  गुरू नानक महाल या चार मजली इमारतीमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्यासह हिंदू राज्यकर्ते आणि राजकुमारांच्या तसबिरी होत्या.  दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांना या महालाच्या मालकाबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोक या इमारतीला बाबा गुरू नानक महाल असे संबोधतात. भारतासह अनेक देशातील शीख येथे येत असत, असे स्थानिक नागरिक मोहम्मद अस्लम याने सांगितले.  काही बड्या स्थानिक व्यक्तींकडून या वास्तूची तोडफोड सुरू आहे.  मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने काहीही कारवाई केलेली नाही. तसेच कुणीही येथे आलेला नाही. या भागातील बड्या लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने या वास्तूला उद्ध्वस्त केले. तसेच त्यातील मौल्यवान खि़डक्या दरवाजे, तावदाने आणि लाकडे विकून टाकली असे स्थानिक मोहम्मद अश्रफ यांनी सांगितले. 

दरम्यान, हे वृत्त प्रकाशित करणाऱ्या डॉन या वृत्तपत्राने या इमारतीच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या इमरातीत राहणाऱ्यांपासून ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र या इमारतीच्या मालकीबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.   दरम्यान, नरोवालचे उपायुक्त वहीद असगर यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या नोंदींमध्ये या इमारतीचा कोणताही उल्लेख केलेला नाही. ही इमारत ऐतिहासिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही नगरपालिका समितीच्या नोंदींचा तपास करत आहोत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhistoryइतिहासInternationalआंतरराष्ट्रीय