शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sp Hinduja Death: हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एसपी हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 19:41 IST

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती

Sp Hinduja Death: हिंदुजा ग्रुपचे चेअरमन आणि चार भावांपैकी सर्वात मोठे असलेले श्रीचंद परमानंद हिंदुजा (SP Hinduja) यांचे आज, बुधवारी वयाच्या ८७व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज लंडनमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदुजा ग्रुपचे प्रवक्ते यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 'गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला आज आमच्या कुटुंबाचे प्रमुख आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्री एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना अत्यंत दु:ख होत आहे. ते ब्रिटिश नागरिक होते. त्यांचे लंडनमध्ये निधन झाले,” असे कुटुंबाचे प्रवक्ते म्हणाले.

हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ बंधू असलेले एसपी हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन झाले. हिंदुजा कुटुंबात एसपी हिंदुजा यांच्या व्यतिरिक्त गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हे तीन भाऊ आहेत. एसपी हिंदुजा यांच्या निधनाची माहिती देताना कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांच्यासह संपूर्ण हिंदुजा कुटुंब अत्यंत दुःखाने कळवत आहे की, कुटुंबाचे प्रमुख आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाले आहे.

एसपी हिंदुजा वयाच्या १८ व्या वर्षापासून व्यापारउद्योगात सक्रिय

श्रीचंद हिंदुजा यांना एसपी म्हणूनही ओळखले जात होते. हिंदुजा ग्रुपचे संस्थापक पीडी हिंदुजा यांचे ते ज्येष्ठ पुत्र. हिंदुजा ग्रुप आणि चॅरिटेबल फाऊंडेशनचे ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एसपी आपल्या वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. भारतीय वंशाच्या हिंदुजा यांनी नंतर ब्रिटिश नागरिकत्व घेतले आणि ते लंडनमध्ये राहिले. श्रीचंद पी हिंदुजा यांचे मधू यांच्याशी लग्न झाले असून त्यांना सानू आणि वीणू या दोन मुली आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशोक लेलँड आणि बँकिंग क्षेत्रातील इंडसइंड बँक यांसारख्या कंपन्यांमध्ये हिंदुजा समूहाचा मोठा हिस्सा आहे. इंडसइंड बँकेचे प्रमोटर हिंदुजा समूह आहे.

टॅग्स :LondonलंडनAutomobileवाहनbankबँक