रेस्टॉरंट तर तुम्ही खूप पाहिली असतील अथवा त्याबद्दल तुम्ही ऐकून असाल. पण आता जमिनीवरबरोबरच पाण्यातील आणि पाण्याखालील रेस्टॉरंटची माहिती पुढे येत आहे. पण, तुम्ही असे रेस्टॉरंट पाहिले आहे काय जे हवेत आहे. बेल्जियममधील हे रेस्टॉरंट चक्क हवेत आहे. नेहमीची गर्दी, ट्राफिक आणि आजूबाजूचा गोंगाट याला कंटाळलेले आणि वेगळा अनुभव घेऊ इच्छिणारे लोक या रेस्टॉरंटमध्ये येतात. हवेत सेट केलेल्या या खुर्च्यांवर एका वेळी २२ जण बसू शकतात. आपली खुर्ची जागेवर पूर्णत: फिरवू शकतात. या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक दिवसाचे वेगळे दर आहेत. सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जेवणासाठी १०९ पाउंड आकारले जातात. शुक्रवार, शनिवारसाठी प्रत्येकी १७५ पाउंड आकारले जातात.
बेल्जियममध्ये चक्क हवेत चालते रेस्टॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:37 IST