शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात हायव्होल्टेज ड्रामा! राष्ट्राध्यक्षांचा 'यू-टर्न'; शेख हसीनांच्या राजीनाम्यावर आता म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:21 IST

बांगलादेशात नवीन सरकार स्थापन होऊनही राजकीय अस्थिरता संपण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेसोबतच्या गुप्त करारावरून राष्ट्राध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात नवा भूकंप झाला आहे.

शेजारील देश बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांनंतर बीएनपी प्रमुख तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली खरी, मात्र तिथला सत्तासंघर्ष अद्याप शमलेला नाही. आता बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन आणि मोहम्मद युनूस यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादात आता कट्टरपंथी 'जमात-ए-इस्लामी'नेही उडी घेतली असून राष्ट्राध्यक्षांवरच टीकेची तोफ डागली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमका वाद काय?

नवे सरकार आणि अंतरिम प्रशासनाचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यात सध्या 'कोल्ड वॉर' सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष शहाबुद्दीन यांनी युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युनूस यांनी बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात एक गोपनीय करार केल्याचा दावा शहाबुद्दीन यांनी केला आहे. "कोणत्याही देशासोबत करार करताना त्याची माहिती राष्ट्राध्यक्षांना देणे बंधनकारक आहे, मात्र युनूस यांनी हे नियम धाब्यावर बसवले," असा आरोप राष्ट्राध्यक्षांनी केला.

जमात प्रमुखांचा राष्ट्राध्यक्षांवर पलटवार

राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेनंतर जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान मोहम्मद युनूस यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्राध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले. "शेख हसीना यांनी सत्ता सोडली त्या दिवशी नेमकं काय घडलं, हे राष्ट्राध्यक्षांनी लपवून का ठेवलं? त्या दिवशी त्यांनी हसीनांचा राजीनामा स्वीकारल्याचे देशाला सांगितले होते, मग आताच त्यांना पुराव्यांची आठवण कशी झाली?" असा बोचरा सवाल शफीकुर रहमान यांनी केला आहे.

हसीनांच्या राजीनाम्यावरून संभ्रम

शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी देशाला संबोधित करताना सांगितले होते की, मी पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, आता दोन महिन्यांनंतर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. "मी फक्त ऐकले आहे की त्यांनी राजीनामा दिला, पण माझ्याकडे त्याचे कोणतेही लेखी पुरावे नाहीत," असे विधान शहाबुद्दीन यांनी केल्याने बांगलादेशात नवा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

बीएनपीचे आभार आणि पुढील दिशा

वादाच्या या भोवऱ्यात राष्ट्राध्यक्षांनी 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'चे आभार मानले आहेत. आंदोलनाच्या काळात केवळ बीएनपी नेत्यांच्या आणि लष्कराच्या पाठिंब्यामुळेच आपण पदावर राहू शकलो, असे त्यांनी मान्य केले. दुसरीकडे, युनूस प्रशासन आणि नवीन सरकारमधील हा संघर्ष बांगलादेशला पुन्हा एकदा अराजकतेकडे नेतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh High-Voltage Drama: President's U-Turn on Sheikh Hasina's Resignation

Web Summary : Bangladeshi President Shahabuddin's U-turn on accepting Sheikh Hasina's resignation sparks controversy. He denies written proof, while Jamaat-e-Islami criticizes him. BNP support acknowledged amid political turmoil and fears of potential chaos.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश