शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

फिनलँडमध्ये हेलसिंकीचा भाग सील; ‘कोविड-१९’मुळे २७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:35 IST

: उर्वरित देशामध्ये तुलनेने कमी बाधित

अभय नरहर जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘जगातील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश’ म्हणून फिनलँड या देशाची ओळख आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीची झळ याही देशाला बसली असली, तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. ६ एप्रिलअखेरपर्यंत या देशात ३२ हजार ८०० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दोन हजार १७६ जण कोरोनाबाधित झाले आहेत. २७ जण या साथीत मृत्युमुखी पडले आहेत. हेलसिंकी हे राजधानीचे शहर असलेल्या उसिमा जिल्ह्यात एक हजार ३६२ जण कोरोनाबाधित आहेत.फिनलँडच्या इतर भागात फारच कमी प्रादुर्भाव आहे. येथे सध्या कामानिमित्त गेलेल्या मूळचे पुणेकर श्रीनाथ केसकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना या देशातील कोरोनासंदर्भातील आपली निरीक्षणे नोंदवली. फिनलँड हा उत्तर युरोपातील स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलँडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलँडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलँडची राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. केसकर यांनी सांगितले, की फिनलँडवासीय अतिलोकशाहीवादी असल्याने सरकारला अचानक बंदी करता येत नाही. तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील सरकारने फिनलँडमधून बाहेर जाणे व बाहेरून येणे बंद केले. या लॉकडाऊनच्या काळात तुमच्याकडे योग्य कारण असेल तरच परवानगी मिळते. हा निर्णय १६ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला आहे. साधारण १२ दिवस विचार, चर्चा केल्यानंतर येथील सरकारने २८ मार्चपासून उसिमा जिल्हा म्हणजे हेलसिंकी परिसर आयसोलेट म्हणजेच सील केला आहे.केसकर यांनी सांगितले, की येथेही भारताप्रमाणे कोरोनाच्या चाचण्या करण्याची क्षमता कमी असल्याने सरसकट चाचण्या केल्या जात नाहीत. सरकारने कॉटेजचा उपयोग विलगीकरणासाठी केला आहे. त्यासाठी मोठी रिकामी अपार्टमेंट वापरली जात आहेत. येथील सर्व प्रमुख मार्गांवर पोलीस आहेत. आता इथे उन्हाळा सुरू झाला. रात्री आठपर्यंत चांगला प्रकाश असतो. माझ्या माहितीतील कुटुंबाने रात्री अकरानंतर घर शिफ्ट केले. ‘लॉकडाऊन’मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे येथील दुकानांत गर्दी कमी झाली. सर्व हॉटेल, बार, क्लब बंद आहेत. सुपर मार्केट, मॉलमध्ये सर्व वस्तू मिळतात. मात्र सॅनेटायझर व मास्क मिळत नाहीत. ते शोधावे लागतात. येथील सरकारने भारतात अडकलेल्या फिनिश नागरिक परत आणले आहे. गोवा व मुंबई येथून दोन खास विमाने पाठवली. भारताप्रमाणेच येथेही काही मूर्ख लोक ‘लॉकडाऊन’ला न जुमानता काही बाहेर फिरत असतात. पण बाकी बरेच लोक चांगली काळजी घेत आहे. गॉगल घालत आहेत. एकमेकांपासून दूर राहतात. सगळ्यात वाईट म्हणजे येथे आता कामगार कपात सुरू झाली आहे.‘एचसीएल’ हा येथील पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. येथील रहिवासी ‘एचसीएल’चाएक-दोन किंवा ३ महिन्यांचा सीझन पास काढतात. हा पास बस, ट्राम, मेट्रो, रेल्वे सगळीकडे चालतो. येथे सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू असले तरी लोक फारच कमी प्रवास करत आहे. त्यामुळे एचसीएलने ज्या लोकांनी सीझन पास काढले आहेत त्यांनी न वापरलेली रक्कम परत करणे सुरू केल्याची माहितीही केसकर यांनी दिली.इमारती केल्या निळ्या रंगाने प्रकाशित!हेलसिंकी येथील फिनलँडिया हॉलसारख्या महत्त्वाच्या इमारती निळ्या रंगाने प्रकाशित केल्या आहेत. कोरोना साथ हटवण्यासाठी आणि रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि इतर साहायक कर्मचाऱ्यांना अभिवादन म्हणून तसे करण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचाºयांसह अन्न वितरण करणारे कर्मचारी, वाहनचालक, या मोहिमेत सहभागी शिक्षक, स्वच्छता कर्मचारी या सर्वांना याद्वारे अभिवादन करण्यात आले. - श्रीनाथ केसकर, हेलसिंका, फिनलँड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या