शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चीनमध्ये तान्ह्या बाळांनाही घातलं जातंय हेल्मेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 07:53 IST

बाळाला जितक्या लवकर ही हेल्मेट्स वापरायला तुम्ही सुरुवात कराल, तितकं चांगलं असं मानलं जातं.

आपलं मूल सुंदर असावं असं कोणाला वाटत नाही? खरं तर आपलंच मूल जगात सर्वात सुंदर असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण त्यातही ते अजून सुंदर व्हावं, दिसावं, हेल्दी असावं यासाठी पालकांचा कोण आटापिटा सुरू असतो.. बाळाच्या जन्माअगोदरपासून आणि जन्मानंतर तर विचारूच नका.. त्याच्यासाठी महागड्या क्रिम्स विचारू नका, त्याच्यासाठी वेगवेगळ्या तेलांनी मालिश विचारू नका.. त्याच्यासाठी सोन्याच्या चाटणापासून ते वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा माराही सुरू असतो.. 

बाळाच्या कपड्यांचं तर, काय विचारता ! आज हा ड्रेस तर, उद्या तो ड्रेस !.....पण आपलं मूल सुंदर दिसावं, असावं यासाठी कोणी बाळाला हेल्मेट घालत असेल? हो, चीनमध्ये सध्या ही फार मोठी क्रेझ आहे. अनेक पालक, त्यातही उच्चभ्रू पालक आपलं बाळ मोठेपणीही सुंदर दिसावं आणि सुंदरपणाच्या सर्व व्याख्यांमध्ये त्यानं फिट बसावं यासाठी त्याला हेल्मेट परिधान करीत आहेत. तेही अगदी बालपणी!  - पण, बाळाला का घालायचं हे हेल्मेट? 

चीनमध्ये सध्या अशी मान्यता आहे की, ज्या बाळाचं डोकं गोल ते सुंदर ! बाळाच्या डोक्याला मुख्यत्वे आकार मिळतो तो पहिल्या तीन महिन्यांत. बाळाचं डोकं गोल राहावं, ते चेपलं जाऊ नये, यासाठी त्याला हेल्मेट घालायचं! अर्थात हे हेल्मेट विशिष्ट पद्धतीनं तयार केलेलं असतं, तुलनेनं वजनाला हलकं असतं आणि बाळाला त्याचा त्रास होत नाही असं मानलं जातं. बरं, गोल डोक्याच्या बाळाची काही महिन्यांसाठीची ही हौस किती रुपयांत जाते. भारतीय चलनात विचार केला तर, यातल्या सर्वसाधारण हेल्मेट्सची किंमत सव्वातीन लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे ! अर्थात ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कमी किमतीची हेल्मेट्सही बाजारात उपलब्ध आहेत.

हे झालं हेल्मेटचं, पण, बाळाचं डोकं, कवटी गोल राहावी यासाठी इतरही अनेक प्रॉडक्ट्स बाजारात आली आहेत. त्यात बाळाच्या डोक्याला आकार देणाऱ्या खास तऱ्हेच्या मॅट्स, ऊशा.. अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या साऱ्याच वस्तू सध्या चांगलाच गल्ला जमवताहेत.  ‘टॅन्सेन्ट न्यूज’च्या वृत्तानुसार चीनमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाला तो आत्ता या ऑक्टोबर महिन्यांत. ‘गोल डोक्याचं बाळ सुंदर’ हे ब्युटी स्टँडर्ड तिथे अलीकडेच सेट झाल्यामुळे बाळाला हेल्मेट घेण्यासाठी पालकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. गोल आकाराचे हे हेल्मेट बाळांची विकसित होणारी कवटी गोल तर, ठेवतेच, पण, मागच्या बाजूनं ती चपटी होण्यापासूनही रोखते, असा अनेक उत्पादकांचा दावा आहे. त्यामुळे पालक जास्तीत जास्त वेळ बाळाच्या डोक्यावर हे हेल्मेट कसं राहील, या प्रयत्नात असतात. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सौंदर्याच्या या मापदंडाच्या बाबतीत काळाची चक्र संपूर्णत: उलटी फिरली आहेत. एक काळ असा होता, जेव्हा बाळाचं डोकं मागच्या बाजूनं चपटं असणं भाग्याचं प्रतीक मानलं जात होतं. त्यामुळे बाळांना मुद्दाम अशा तऱ्हेनं झोपवलं जायचं की, त्यांच्या डोक्याचा मागचा भाग चपटा राहील.. पण, हा ट्रेंड आता सपशेल मागे पडला आहे आणि ‘मागास’पणाचा मानला जात आहे. ‘द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या नियतकालिकानंही काही महिलांचे अनुभव सांगितले आहेत. त्यातील एक महिला आपला ‘चमत्कारी’ अनुभव सांगताना म्हणते, बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहावा, तो चपटा असू नये यासाठी बाळाच्या जन्मापासूनच मी प्रयत्न करीत होते. माझ्या घरच्यांनी यासाठी मला खूप विरोध केला, पण, मी त्यांचं काहीएक ऐकलं नाही. मी बाळाला हेल्मेट घातलंच.

आज मी अतिशय खुश आहे, कारण माझ्या बाळाचं डोकं एकदम गोल गरगरीत आहे ! सात महिन्यांच्या माझ्या मुलीसाठी कस्टम मेड ‘हेड करेक्शन गिअर’चा वापर मी केला. दुसऱ्या एका महिलेनं आपला अनुभव माध्यमांशी शेअर करताना सांगितलं, जग आता बदलतं आहे. नव्या जगाबरोबर आपणही बदललं पाहिजे. जुन्या पिढीनं आपला हेका सोडला पाहिजे. सौंदर्याचे नवे मापदंड बाळांच्या आजी-आजोबांनीही माहीत करून घ्यायला हवेत. वाकडे दात सरळ होण्यासाठी किंवा अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण दातांना जसे ब्रेसेस लावतो, तसेच हे हेल्मेट ! आपल्या बाळांसाठी ही सेवा उपलब्ध आहे, तर, त्याचा वापर करण्याऐवजी त्याला नाकं कशाला मुरडायची?

चपटं डोकं नकोच!

बाळाला जितक्या लवकर ही हेल्मेट्स वापरायला तुम्ही सुरुवात कराल, तितकं चांगलं असं मानलं जातं. म्हणजे बाळ साधारण तीन महिन्यांचं असल्यापासून हे हेल्मेट वापरायला सुरुवात केली तर, साधारण महिन्याभरातच फरक दिसायला लागतो आणि बाळाचं डोकं गोल व्हायला सुरुवात होते. एक महिला पालक सांगते, कोणत्याही नव्या गोष्टींवर टीका करणं सोपं आहे, पण चपट्या डोक्यामुळे महिलांना किती त्रास सोसावा लागतो आणि समाजाकडूनच त्यांना किती हिणवलं जातं हे मी स्वानुभवानं सांगू शकते. माझ्या मुलीनंही या यातनांना सामोरं जावं असं मला बिलकूल वाटत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी माझ्या मुलीसाठी मी या अत्याधुनिक ‘हेडिगअर्स’चा वापर करणारच.

टॅग्स :chinaचीन