शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! भारतीय सैन्यानं 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 17:05 IST

भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे.

नवी दिल्ली - भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे. भारतीय सैनिकांची एक तुकडी सध्या युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहे. 

काँगोच्या पूर्व भागातील न्याबिऑन्डो गावांमध्ये भारतीय सैन्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.  48 तासांच्या मोठ्या मोहिमेनंतर भारतीय सैन्याला 16 मुलं आणि सहा मुलींना वाचवण्यात यश आल्याचे काल भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.  16 सप्टेंबर रोजी गावांतील लोकांकडून लहान मुलांना काही शस्त्रधारी लोकांची एक तुकडी 'चाइल्ड सोल्जर' बनवत असल्याचे समजलं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी त्यांच्या तावडीतून 22 जणांची सुटका केली. त्या लहान मुलांना भारतीय सैनिकांनी यूएनच्या चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सीकडे सुपूर्द केलं.  तर लहान मुलांची सुटका केल्यानंतर त्याच दिवशी भारतीय सैन्याच्या दुसऱ्या एका तुकडीनं मिरकी भागातील 200 कुटुंबांना स्थलांतरीत होण्यापासून अडवलं. दोन स्थानिक विरोधी गटांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही कुटुंबं स्थलांतरीत होतं होती. त्या सर्वच लोकांमध्ये भयग्रस्थ वातावरणही निर्माण झालं होतं असं सैन्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, भारतीय सैन्यांनी त्या समुहाला तेथून बाहेर काढलं त्यामुळे तेथील स्थिती नियंत्रणात आली. 

जगभरात सध्या 2600 पेक्षा आधिक भारतीय सैनिक युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत कार्यरत आहेत. सर्वात मोठा आणि अवडघड संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनसाठी हे काम करतात. मध्य आफ्रिकातील राष्टांमध्ये सर्वाधिक भारतीय सैनिक तैनात आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान