शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरनं निघालेलं व-हाड पोहचलं जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 22:16 IST

ढाका, दि. 10 -  लग्नाला निघालेलं व-हाड लग्न समारंभाऐवजी थेट जेलमध्ये गेल्याचं ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. होय, अशीच एक घटना बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये असलेल्या काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये घडली. विशेष म्हणजे, व-हाड एका खाजगी हेलिकॉप्टरने निघालं होतं.व-हाड खाजगी हेलिकॉप्टरमधून लग्नासाठी निघालेलं होतं. यावेळी हे हेलिकॉप्टर चुकीमुळं थेट काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये ...

ठळक मुद्देव-हाड लग्न समारंभाऐवजी थेट जेलमध्येकाशीमपुरा सेंट्रल जेलमधील घटनाजेल प्रशासनाची तारांबळ चौकशी केल्यानंतर या व-हाडींची सुटका

ढाका, दि. 10 -  लग्नाला निघालेलं व-हाड लग्न समारंभाऐवजी थेट जेलमध्ये गेल्याचं ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. होय, अशीच एक घटना बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये असलेल्या काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये घडली. विशेष म्हणजे, व-हाड एका खाजगी हेलिकॉप्टरने निघालं होतं.व-हाड खाजगी हेलिकॉप्टरमधून लग्नासाठी निघालेलं होतं. यावेळी हे हेलिकॉप्टर चुकीमुळं थेट काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये उतरलं. हेलिकॉप्टर जेलमध्ये उतरल्यामुळे जेल प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाला वाटलं की, जेलमधील दहशतवादी कैद्यांची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे तातडीनं जेलमधील सुरक्षा वाढवली आणि हाय अलर्ट देण्यात आला. पोलिसांनी हेलिकॉप्टरला चहूबाजूंनी घेरलं आणि हेलिकॉप्टरसह व-हाडी मंडळींना ताब्यात घेतलं. त्यानंतर व-हाडी मंडळींची चौकशी केल्यानंतर असं समोर आलं की, काशीमपुरा सेंट्रल जेलच्या बाजूला असलेल्या गावातील एका लग्नसमारंभाला हे व-हाड हेलिकॉप्टरमधून चाललं होतं. मात्र, चुकीमुळं त्या गावाऐवजी थेट जेलमध्ये हेलिकॉप्टर उतरलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या व-हाडींची सुटका केली. ही घटना चुकीमुळं झाली. मात्र, जेलमधील दहशतवादी कैद्यांची सुटका करण्यासाठी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत, असं काशीमपुरा सेंट्रल जेलचे महानिरीक्षक ब्रिगेडियर जनरल सय्यद इफ्तेखार उद्दीन यांनी सांगितलं. याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरचा पायलट हवाई दलातील निवृत्त अधिकारी होता. व-हाडी मंडळी मूळचे बांगलादेशी असले तरी राहायला ते मलेशियात आहेत.