गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतानेपाकिस्तानला पुन्हा एकदा तवी नदीला पूर येण्याचा इशारा दिला आहे. भारताने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हा इशारा पाठवला असून, सततच्या पावसामुळे काही धरणांचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता असल्याचं यात नमूद केलं आहे. याआधीही सोमवार आणि मंगळवारी असेच अलर्ट पाठवण्यात आले होते. हे सर्व अलर्ट मानावतेच्या दृष्टिकोनातून देण्यात आले आहेत.
सिंधु जल करार रद्द असूनही अलर्ट जारीया वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार रद्द केला आणि पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवले. मात्र, सध्याची पूरस्थिती आणि मानवी जीवनाची सुरक्षा लक्षात घेता, हा करार रद्द झाला असला तरी भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पूर अलर्ट दिला आहे.
तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारीही आणखी अलर्ट पाठवण्यात आले आहेत.
धरणांचे दरवाजे उघडणे अपरिहार्यउत्तर भारतात संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये नद्या आणि जलाशयांची पातळी खूप वाढली आहे. त्यामुळे काही धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हा निर्णय लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन घेण्यात आला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
जम्मूमध्ये तवी आणि इतर अनेक नद्यांना पूर आला आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्येही सतलज, बियास, रावी आणि इतर छोट्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.